Book Festival esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Book Festival: ग्रंथप्रेमींसाठी धुळ्यात 2 दिवसीय ग्रंथोत्सव! विविध कार्यक्रमांसह ग्रंथ प्रदर्शन

Dhule News : राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटनमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ फेब्रुवारीला सकाळी अकराला ग्रंथोत्सवाचे उद्‍घाटन होईल.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Granthotsav : ग्रामीण व शहरी जनतेत वाचनसंस्कृती रुजावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ, साहित्यविषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे यांच्यातर्फे धुळ्यात ग्रंथ भवन (पांझरा नदीकिनारी) येथे २८ व २९ फेब्रुवारीला ग्रंथोत्सव-२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांनी दिली. (Dhule book festival marathi news)

राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटनमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ फेब्रुवारीला सकाळी अकराला ग्रंथोत्सवाचे उद्‍घाटन होईल. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, मदतकार्य व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील प्रमुख पाहुणे असतील.

ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोरसे अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, आमदार अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, सत्यजित तांबे, जयकुमार रावल, काशीराम पावरा, कुणाल पाटील, मंजुळा गावित, फारूक शाह, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

माजी आमदार अनिल गोटे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी, राज्य ग्रंथ संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे विशेष अतिथी असतील.

ग्रंथोत्सवातील कार्यक्रम असे

२८ फेब्रुवारीला सकाळी नऊला ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरवात होईल. जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्‍घाटन होईल. ही ग्रंथदिंडी जयहिंद सीनिअर कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, जिल्हा ग्रंथालय या मार्गावरून काढण्यात येईल. दुपारी एक ते दोनदरम्यान कथाकथन कार्यक्रम होईल.

रेखा मुंदडा अध्यक्षस्थानी असतील. वृषाली खैरनार, राजेश खलाणे यांचा सहभाग असेल. दुपारी दोन ते तीनदरम्यान बालकवी संमेलन, दुपारी तीन ते पाचदरम्यान शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. २९ फेब्रुवारीला सकाळी अकरा ते बारादरम्यान परिसंवाद.

डॉ. अनिल बैसाणे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, डॉ. शशिकला पवार यांचा सहभाग असेल. दुपारी साडेबारा ते दोनदरम्यान, दोनदरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम. दुपारी दोन ते अडीच बहुभाषिक कविसंमेलन होईल. (Latest Marathi News)

यात प्रभा बैकर, रमेश राठोड, कमलेश शिंदे, शाहीर श्रावण वाणी, शाहीर गंभीर बोरसे, मतीन अन्वर, दत्तात्रय कल्याणकर, आप्पा खताळ, वीरेंद्र बेडसे, प्रवीण पवार, गुलाब मोरे, कलाम अन्वर, पूनम बेडसे, शामल पाटील, चंद्रशेखर कासार, अरविंद भामरे, सुरेश मोरे, सुनील पाटील आदी कवी सहभागी होतील. दुपारी साडेतीन ते साडेचार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम होईल. यात जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे मार्गदर्शन करतील.

समारोप सत्र

सायंकाळी साडेचार ते साडेपाचदरम्यान ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. जिल्हाधिकारी श्री. गोयल अध्यक्षस्थानी असतील. पोलीस अधीक्षक श्री. धिवरे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा कोशागार अधिकारी प्रवीण पंडित, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पुष्पलता पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, ज्येष्ठ साहित्यिक जगदीश देवपूरकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

या ग्रंथोत्सवाचा साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समिती अध्यक्ष नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, सदस्य शिक्षणाधिकारी श्रीमती पाटील, जिल्हा माहिती अधिकारी बोडके, खानदेश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यवंशी, प्रकाशक संघटनेचे प्रतिनिधी प्रकाश पाटील, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ठाकूर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT