Agriculture Award esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे जिल्ह्यातील 5 जणांना शासनाकडून ‘कृषी पुरस्कार’

Dhule : महाराष्ट्र शासनाकडून २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाराष्ट्र शासनाकडून २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील पाच व्यक्तींना कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी बांधव व संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न.(Dhule 5 people from district have been awarded Agriculture Award by Govt)

वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडित, युवा शेतकरी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार प्रदान करून शेतकरी, संस्था यांचा सन्मान करण्यात येतो. यात धुळे जिल्ह्यातील पाच व्यक्तींना पुरस्कार घोषित झाले.

पुरस्कारार्थी असे

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट)साठीचा पुरस्कार वसंतराव भिकनराव साळुंखे (मु.पो. मुकटी, ता.जि. धुळे) व महेंद्र निंबा परदेशी (मु.पो. कुसुंबा, ता.जि. धुळे) यांना २०२० या वर्षातील पुरस्कार जाहीर झाला. (latest marathi news)

२०२१ या वर्षासाठी दिनेश नारायण माळी (मु.पो. बेटावद, ता. शिंदखेडा, जि. धुळे) तसेच २०२२ या वर्षासाठी यशवंत निंबा महाजन (मु.पो. बेटावद, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांना पुरस्कार जाहीर झाला.

त्याप्रमाणे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार २०२० या वर्षासाठी शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय अरविंद बोरसे यांना जाहीर झाला, असे नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त ३० मंडळांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT