Abha card esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: वैद्यकीय उपचारांसाठी आभा कार्ड बंधनकारक! रुग्णांसाठी नियम; डॉक्टरांसह संस्थेकडे आरोग्याविषयी माहिती कायम उपलब्ध राहणार

Dhule News : आभा कार्ड काढणे आवश्यक ठरणार आहे. रुग्णालयांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रीसाठी आभा कार्डची नोंदणीच ग्राह्य धरली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागामध्ये नोंदणीसाठी आता आभा कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आभा कार्ड काढणे आवश्यक ठरणार आहे. रुग्णालयांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रीसाठी आभा कार्डची नोंदणीच ग्राह्य धरली जाणार आहे. (Dhule Abha card mandatory for medical treatment)

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्णयानुसार सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अपघात विभाग आणि आपत्कालीन विभागांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या पूर्वनोंदणीसाठी आभा कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णांची नोंदणी करताना रुग्णालयातील नोंदणी क्रमांकाबरोबरच आभा कार्ड क्रमांकही आवश्यक असणार आहे.

रुग्ण प्रमाणित नोंदणी

वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागा, नवीन महाविद्यालये, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी, वार्षिक नूतनीकरण या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी रुग्णालयामधील रुग्णांची संख्या आणि उपचारासाठी उपलब्ध असणारी साधनसामग्री विचारात घेणे महत्त्वाचे असते. यासाठी रुग्णांची प्रमाणित नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे आभा कार्ड हे रुग्ण नोंदणीसाठी आवश्यक करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. (latest marathi news)

नोंदणी ग्राह्य धरणार

जिल्ह्यासह राज्यात २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी आणि नंतरच्या मूल्यांकनातील निर्णयांसाठी, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रीसाठी आभा कार्ड नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. दरम्यान, आभा कार्ड नसेल तरी सध्या कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले आहे.

प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी आरोग्य यंत्रणांमध्येही रुग्ण नोंदणीसाठी आभा कार्ड आवश्यक केले जाणार, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

आरोग्य व्यवस्था सुधारण्यास मदत

नोंदणीसाठी आभा कार्ड आवश्यक केल्याने रुग्णांच्या मागील उपचाराची संपूर्ण माहिती डॉक्टरांना उपलब्ध होणार आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील औषधे, उपकरणे, रुग्णांचे आजार यांचा डाटा उपलब्ध होऊन सरकारला आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजन करणे सोपे होईल.

ज्यामुळे आरोग्यव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विशेषोपचार सुविधा पुरविण्यात येतात. त्यामुळे आभा कार्डच्या वापरामुळे रुग्णांचा डाटा तसेच महाविद्यालये व रुग्णालयात आवश्यक लहान उपकरणांचा आढावा घेणे शक्य होणार आहे. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनासाठी याचा लाभ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Baba Controversial Statement Row : "ईशनिंदेला माफी नाही, राज्यात पाय ठेवू देणार नाही!"; प्रभू श्रीकृष्णावरील 'त्या' विधानावरून देशात मोठा भडका; दोन दिग्गज नेत्यांमध्ये थेट युद्ध

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

SCROLL FOR NEXT