Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fraud Crime : पीडितेची शारीरिक संबंधातून फसवणूक; आरोपीला 10 वर्षे कारावास

Dhule Fraud Crime : गणेश माळी याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Fraud Crime : अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून बाळाला जन्म दिल्यावर पीडितेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे कारावासाची शिक्षा व एक लाख दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तो न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, तसेच अन्य कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीच्या शिक्षेचा आदेश दिला.

न्यायालयाने एकूण दंडाच्या रकमेतून ८० हजार पीडितेस नुकसानभरपाई देण्याचेही निर्देश दिले आहेत.

गणेश ऊर्फ भरत अशोक माळी (भिल, रा. नांद्रे, ता. धुळे) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी हा निकाल दिला. गणेश माळी याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यातून पीडितेला दिवस राहिले.

यासंबंधी अल्पवयीन मुलीने गणेश याला सांगितले असता, तो लग्न करण्यास तयार आहे, हे माझेच मूल आहे, तू त्यास पाडू नको, मी आई-वडिलांना सांगतो, आपण लवकरच लग्न करू, असे सांगत होता. बदनामीपोटी पीडितेने घडलेली बाब कोणाला सांगितली नाही. काही दिवसांनी गणेश सुरत (गुजरात) येथे पळून गेला.

पीडितेने याबाबत गणेश याच्या आई-वडिलांना सांगितले असता, त्यांनी लग्न लावून देऊ, पोलिस ठाण्यात जाऊ नका, असे सांगत राहिले. नंतर गणेश पाच ते सहा महिन्यांनी पीडितेस नांदविण्यासाठी घेऊन गेल्यावर त्याच्या आई-वडिलांनी घरात घेण्यास नकार दिला.

त्यामुळे गणेश हा त्याच्या मामाच्या घरी पीडितेला घेऊन गेला. दोघे तिथे पाच-सहा महिने पती-पत्नीसारखे राहिले. तिथेही त्याचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. लग्न करण्याविषयी पुन्हा-पुन्हा विचारणा करूनही गणेश व त्याचे मामा-मामी शिवीगाळ करीत होते. तेव्हा मूल झालेल्या पीडितेला माहेरी पोचवून दिले.

गणेशने १० जुलै २०१६ ला परस्पर दुसऱ्या मुलीशी लग्न केले. अल्पवयीन पीडितेची फसवणूक झाल्याने २९ ऑगस्ट २०१६ ला धुळे तालुका पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक नंदा पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी न्या. देशमुख यांच्यापुढे झाली.

सरकार पक्षातर्फे पीडिता, डॉ. गढरी, मुख्याध्यापक शारदा खारकर, संजय पाटील, आबा पवार, तपास अधिकारी एन. ए. पाटील व रासायनिक विश्लेषक कोमल महाजन यांची साक्ष झाली. बाळाच्या डीएन नमुने तपासणीत गणेश याच्यापासून बाळ झाल्याचे सिद्ध झाले.

साक्षी पुराव्यांच्या आधारे न्या. देशमुख यांनी गणेश ऊर्फ भरत याला दोषी ठरवीत शिक्षा सुनावली. फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. गणेश वाय. पाटील यांनी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पाहिले. याकामी पैरवी अधिकारी सुशीला वळवी, दत्तू सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; प्रशासनाचे दुर्लक्ष!

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

SCROLL FOR NEXT