Inspector Abhishek Patil of Dhule taluka police station along with the thief who was arrested along with the goods in the vehicle battery theft case and the team. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : वाहनांची बॅटरी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तालुका पोलिसांची कारवाई

Dhule Crime : चारचाकी वाहनांची बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीचा धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पथकाने पर्दाफाश केला.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : चारचाकी वाहनांची बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीचा धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पथकाने पर्दाफाश केला. टोळीतील एकास अटक करून त्याच्याकडून एकूण १२ बॅटरी हस्तगत केल्या. धुळे ते चाळीसगाव रोडवरील विंचूर गाव शिवारात रस्त्यावर पार्किंग केलेले काँक्रिट मिक्सर या वाहनाच्या १८ हजार रुपये किमतीच्या दोन बॅटरी चोरट्याने लंपास केल्या. १२ ते २५ सप्टेंबरदरम्यान ही चोरी झाली. (Action of taluka police bust gang stealing vehicle batteries)

याबाबत जितेंद्र प्रसाद यांच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तसेच किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, ललित खळगे, मनोज शिरसाठ, विशाल पाटील, धीरज सांगळे यांच्या पथकाला गोपनीय माहिती काढण्याच्या सूचना दिल्या.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलद गतीने फिरविली. यात शकिल शेख सलीम शेख ऊर्फ शकिल सेंधवा (वय ३८, रा. बाबानगर, नटराज टॉकीजसमोर, ऐंशीफुटी रोड, धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील १८ हजार रुपये किमतीच्या दोन बॅटरीही काढून दिल्या.

अन्य गुन्ह्यांची कबुली

पोलिस ठाण्यात दाखल अन्य एका गुन्ह्याचीदेखील त्याने कबुली देत चोरलेल्या १५ हजारांच्या दोन बॅटरी काढून दिल्या. दरम्यान, संशयित शकिल शेख सलीम शेख ऊर्फ शकिल सेंधवा याने त्याच्या साथीदारांसह विविध ठिकाणांवरून चारचाकी वाहनातून बॅटरी चोरीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली. त्याच्याकडून एकूण १२ बॅटरी हस्तगत करण्यात आल्या. त्याने गुन्हा करतेवेळी वापरलेले चारचाकी वाहन (ह्युन्डई अ‍ॅसेंट कार) व अन्य साथीदारांचा धुळे तालुका पोलिस तपास घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

T20 WC : टीम इंडियाने अहमदाबाद येथे खरंच 'हॉटेल' बदललं होतं का? कर्णधार Suryakumar Yadav म्हणाला, कोणीतरी आम्हाला सांगितलं...

पेट्रोल-डिझेलचा साठा किती? इंडियन ऑइलने इंधन टंचाईच्या प्रश्नावर दिलं स्पष्टीकरण

Meta Anti-Scam Tool: WhatsApp-Facebook वर स्कॅमर्सची खैर नाही! मेटाचे नवे अ‍ॅण्टी-स्कॅम टूल्स लॉन्च, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना मोठा झटका

Circuit Bench Kolhapur : सर्कीट बेंचचे पोलिस अधीक्षक, बार असोसिएशनवर कडक शब्दात ताशेरे, महिला वकिल मारहाण प्रकरण

SCROLL FOR NEXT