biogas project (file photo)
biogas project (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वर्षभरानंतरही बायोगॅस प्रकल्प अपूर्णच! 12 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे १२ कोटी रुपये खर्चाचा बायोगॅस प्रकल्पाचा विषय मंजूर होऊन व कार्यादेश देऊन आता वर्ष लोटले तरी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. अधिकारी मात्र ‘काम चालू आहे, प्रगतिपथावर आहे’ अशी उत्तरे देऊन मोकळे होतात. मागील वर्षी अर्थात जानेवारी-२०२३ मध्ये महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले होते. (Dhule after a year biogas project is still incomplete)

आता मे-२०२४ अखेर प्रकल्प पूर्ण होईल, असे अधिकारी म्हणतात. घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लागावी यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात येत आहे. धुळे शहरासाठीही २५ कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला. हा प्रकल्प मंजूर होऊन आता बरीच वर्षे लोटली पण याचे प्रत्यक्ष परिणाम अद्याप दिसत नाहीत.

कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्पही मंजूर झाला. ११ कोटी ८४ लाख ८८ हजार ८५७ रुपये खर्चाच्या या प्रकल्पालाही पाहिजे तशी गती मिळत नसल्याचे चित्र आहे. २७ डिसेंबर २०२२ ला स्थायी समितीने विषय मंजूर केला. त्या वेळी २९ डिसेंबरला नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेत हे काम अडकू नये यासाठी महापालिका प्रशासनाने स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर तातडीने प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश दिला.

मे. एव्हनी एंटरप्राइजेसला हे काम मिळाले आहे. आचारसंहितेच्या महिना-दीड महिना कालावधीत प्रकल्पाचे काम अडकू नये यासाठी तत्परता दाखविली गेली. त्यानंतर मार्च-२०२३ अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण करू, असा विश्‍वास तत्कालीन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात आता वर्ष लोटल्यानंतरही प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असल्याचे आत्ताचे अधिकारी म्हणतात. (latest marathi news)

आता मेचा मुहूर्त

बायोगॅस प्रकल्पाचे कामात तीन डायजेस्ट टँकचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टँक व शेडचे कामही सुरू आहे. प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून, मे-२०२४ अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे कनिष्ठ अभियंता प्रदीप चव्हाण यांनी सांगितले. आता मे-२०२४ मध्ये तरी प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत बायोमायनिंग व इतरही कामे सुरू आहेत. तीही प्रगतिपथावर असल्याचे सांगितले जाते.

तीस टीपीडी क्षमता

शासनाच्या मदतीने धुळे महापालिकेकडून साकार होणारा बायोगॅस प्रकल्प ३० टीपीडी क्षमतेचा आहे. या प्रकल्पासाठी रोज ३० टन ओल्या कचऱ्याची आवश्‍यकता असेल. ओला कचरा उपलब्धतेच्या अनुषंगाने प्रत्येकी दहा टन क्षमतेचे टँक तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे कमी कचरा उपलब्ध झाला तरी बायोगॅसनिर्मितीचे काम सुरू राहणार आहे. निर्मिती होणारा बायोगॅस वाहने व वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Pune Accident News: पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी पोलिसाचं निलंबन? गृहमंत्र्याचे कठोर कारवाईचे आदेश; हे आहे कारण

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT