Bhupesh Deore's farm in Shiwarat is a flourishing field of fenugreek  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agricultural Success: म्हसदीच्या ‘भूपेश’ने साधली शेवगा शेतीत प्रगती! वडील, आजोबांनंतर कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीसाठी संघर्ष

Dhule news : वडील, आजोबा यांच्या निधनानंतर उमेद जागृत ठेवत येथील तरुण शेतकरी वडिलोपार्जित शेतीत स्वतः राबून कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीसाठी संघर्ष करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

दगाजी देवरे‌ : सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : शेती परवडत नाही अशी ओरड केली जाते. ते वास्तवही आहे, पण श्रम, कष्ट करत जिद्द, चिकाटी ठेवली तर शेतीत गतवैभव प्राप्त करणे तसे अवघड नाही. वडील, आजोबा यांच्या निधनानंतर उमेद जागृत ठेवत येथील तरुण शेतकरी वडिलोपार्जित शेतीत स्वतः राबून कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीसाठी संघर्ष करत आहे. (Mhasadi Bhupesh made progress in Shewga farming)

येथील तरुण शेतकरी भूपेश सुनील देवरे यांनी बारा एकर वडिलोपार्जित व पाच एकर बटाईच्या शेतीत शेवगा शेतीतून प्रगती साधत युवकांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. शेतकरी देवरे यांचा नुकताच (स्व.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाकडून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने सन्मानपत्र देऊन गौरव झाला.

शेतकरी कुटुंबातील भूपेशचे वडील सुनील अर्जुन देवरे यांचे २०११ मध्ये निधन झाले. दुष्काळाचा शाप जणू तालुक्याला लागलेला. शेतीतून सावरणे तसे दिव्यच. गावापासून चार किलोमीटर अंतर पाइलाइनद्वारे ठिबकने पाणी देत सतरा एकर क्षेत्रातील शेवगा शेतीतून प्रगती साधली. (latest marathi news)

खरी प्रेरणा आजोबांचीच

भूपेशचे आजोबा अर्जुन देवरे यांचा परिसरात सामाजिक, राजकीय व कृषी क्षेत्रात दबदबा होता. २०२० मध्ये त्यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे सारे कुटुंबच पोरके झाले. कुटुंबातील इतर पुरुष सदस्य शासकीय नोकरीला असल्याने शेतीची पूर्ण जबाबदारी भूपेश यांच्यावर आली. आज ते ती लिलया पेलवत आहेत.

‌टॅक्टरपासून चारचाकीपर्यंत प्रवास

"२०१४ पासून ते भाजीपाला शेतीत वेगळेपण सिद्ध करत आहेत. सत्ताविसाव्या वर्षी शिक्षण अर्धवट सोडून शेतीत रममाण झाले. ओडीसी संकरित वाण लागवड करत अवघ्या सहाव्या महिन्यापासून शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. दर वर्षी ५० टनांपर्यंत उत्पादन घेतले जात असून, सुमारे ३५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न घेतले जात आहे. दर पन्नास-ऐंशी रुपये प्रतिकिलो मिळत असून, बांधावरच विक्रीचे नियोजन असते. चेन्नई, बेंगलोर येथे शेवगा पॅकिंग करत व्यापारी विक्रीसाठी नेतात. शेती व्यवसायातून रोख टॅक्टर, ब्लोअर खरेदी केले असून, नुकतेच चारचाकी वातानुकूलित वाहन खरेदी करण्यासाठी बुकिंगही केले आहे. हे केवळ एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ, स्वतःची उमेद, कष्ट मेहनतीतून झाल्याचे भूपेश सांगतात."

- भूपेश सुनील देवरे, तरुण शेतकरी, म्हसदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT