felicitated Commissioner and Administrator Amita Dagade Patil for passing resolution to change reservation of colony land.
felicitated Commissioner and Administrator Amita Dagade Patil for passing resolution to change reservation of colony land. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : ठरावामुळे सातबाऱ्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality : शहराच्या मिल परिसरातील तुळसाबाईचा मळासह आजूबाजूच्या कष्टकरी, कामगार, गरीब नागरिकांची वसाहत असलेल्या जागेचे आरक्षण बदलण्याचा ठराव महापालिकेच्या प्रशासकीय महासभेने मंजूर केल्याबद्दल माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासह तेथील रहिवाशांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांचे आभार व्यक्त करत सत्कार केला. (Dhule approval of resolution to change reservation of place by administrative general meeting)

मिल परिसरातील तुळसाबाईचा मळा, रासकरनगर, गुरुकृपानगर, इखेनगर, श्रीरामनगर, कोरेनगर, हटकरवाडी, लीलाबाईची चाळ, धनगरवाडासह आजूबाजूच्या वसाहतीच्या पूर्वीच्या आरक्षणामुळे तेथील रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळत नव्हता.

त्यामुळे या जागेचे आरक्षण बदलण्याची कार्यवाही आवश्‍यक होती. महासभेत तसा ठराव मंजूर झाला. २२ फेब्रुवारीला प्रशासकीय महासभेत या ठरावाला अंतिम मान्यता देण्यात आली. शासनाकडून या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर रहिवाशांना सातबारा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक मासुळे व रहिवाशांनी गुरुवारी (ता. २९) मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांची भेट घेत ठराव मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार केला. आता लवकरात लवकर नागरिकांना उतारे देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली. (latest marathi news)

श्री. मासुळे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन, भाजप महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे धुळे शहर विधानसभाप्रमुख अनुप अग्रवाल.

महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिल परिसरातील नागरिकांना घरांचे सातबारा मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे श्री. मासुळे यांनी म्हटले आहे. या वेळी सुनील पाटील, मधुकर पाटील, गंभीर बोरसे, किशोर सरगर, गणेश गायकवाड, वामन मोहिते, प्रकाश देव, संजय मराठे, हिरालाल सूर्यवंशी, किशोर ओतारी, किरण सोनवणे, प्रशांत मराठे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT