wild vegetables esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सातपुडा घेतोय पौष्टिक रानभाज्यांचा आस्वाद! पावसाळ्यामुळे आदिवासी बांधवांची पावले रानावनात

Dhule News : आजच्या आधुनिक युगात पौष्टिक व सेंद्रिय भाज्यांचा आहार मिळविण्यासाठी माणूस वाटेल तितका पैसा खर्च करण्यास तयार आहे, मात्र तरीदेखील त्याला सेंद्रिय व पौष्टिक आहार मिळत नाही.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : आजच्या आधुनिक युगात पौष्टिक व सेंद्रिय भाज्यांचा आहार मिळविण्यासाठी माणूस वाटेल तितका पैसा खर्च करण्यास तयार आहे, मात्र तरीदेखील त्याला सेंद्रिय व पौष्टिक आहार मिळत नाही. आज बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य लोकांना त्या भाज्या विकत घेणे शक्य होताना दिसत नाही. (Rainy season continues tribes of Satpura are eating organic and nutritious food)

मात्र सध्या पावसाळा सुरू असल्याने सातपुड्यातील आदिवासी बांधव मात्र रानावनात नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या रानभाज्यांचा सेंद्रिय व पौष्टिक आहार घेताना दिसत आहे. आदिवासी बांधवांचे जीवनमान खरेतर जंगलावर अवलंबून असल्याने त्यांच्या ८० टक्के गरजा जंगलातूनच पूर्ण होतात. आज जंगल कमी झाले असले तरी जंगलातून.

माळरानावरून मिळणाऱ्या रानभाज्या आजही परिचयाच्या असल्याने पावसाळ्याची चाहूल लागताच आदिवासी बांधवांना आपल्या जंगलातील रानभाज्यांचा चांगला आधार मिळतो. आज बाजारात टोमॅटो १२० रुपये किलो, तर इतर भाज्या ८० ते १०० रुपये किलोपेक्षा कमी दराने मिळत नसल्याने सातपुड्यातील आदिवासी बांधवांना मात्र जंगलातील रानभाज्यांचा चांगला आधार मिळत असल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालविणे सोपे झाले आहे.

पावसाळ्यात रानभाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. दिवसेंदिवस शेतातून रानभाज्या नामशेष होत असल्या तरी ग्रामीण भागात आजही रानभाज्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रानभाज्या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात रानभाज्या महत्त्वाच्या आहेत. त्यात निरोगी आणि आरोग्याला पोषक सर्व अन्नघटक मिळत असल्याने पालेभाज्या दैनंदिन आहारात असणे गरजेचे आहे. (latest marathi news)

त्यातील माठाची थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखविण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठला म्हणतात. त्याचप्रमाणे पोवाडयो (टाकळा), केन्या, कुर्ल्यो, मोरीवड्यो, गाठ्यो, आहलो, नाली भाजी, आंबाडा, हेलाटे, (मशरूम) अशा अनेक प्रकारच्या भाज्या प्रत्येक महिन्यात आदिवासी बांधवांच्या आहारात येत असतात.

सातपुड्याच्या कुशीत रानभाज्यांचा मेळावा..!

रानभाज्यांचे महत्त्व भावी पिढीला व्हावे व त्यांचे संवर्धन व ओळख बाह्यजगाला व्हावी यासाठी दर वर्षी सातपुड्याच्या कुशीत वेगवेगळ्या गावांत रानभाज्यांचा मेळावा आयोजित करण्यात येतो. त्यात विविध गावांतील महिला आपापल्या गावकुशीत तयार होणाऱ्या रानभाज्या आणून त्यांची ओळख, महत्त्व व पौष्टिकतेबद्दल माहिती देतात. त्यामुळे सातपुड्याच्या व्यतिरिक्त असणाऱ्या गावातील व शहरातील जनतेला रानभाज्यांच्या चवीची भुरळ पडू लागली आहे. परिणामी पावसाळा सुरू झाला की अनेकांचे लक्ष सातपुड्याच्या रानभाज्यांवर असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT