Stamp Duty Abhay Scheme esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्या; गायकवाड यांचे आवाहन

Dhule : राज्य शासनाने मुद्रांक शुल्क व दंड माफी सवलत अभय योजना २०२३ लागू केली आहे. या योजनेचा पहिला टप्पा २९ फेब्रुवारीला समाप्त होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्य शासनाने मुद्रांक शुल्क व दंड माफी सवलत अभय योजना २०२३ लागू केली आहे. या योजनेचा पहिला टप्पा २९ फेब्रुवारीला समाप्त होणार आहे. त्यासाठी शनिवारी (ता. २४) आणि रविवारी (ता. २५) या शासकीय सुटीच्या दिवशी येथील सह जिल्हा निबंधक वर्ग- १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी दिली. (Avail Stamp Duty Abhay Yojana Gaikwads appeal)

जिल्ह्यात २९ फेब्रुवारीपर्यंत योजनेत सहभाग नोंदविल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्कावर २५ टक्के व त्यावरील दंडाच्या रक्कमेवर ९० टक्के माफी शासनाने दिली आहे. तसेच १ ते ३१ मार्च या कालावधीत सहभाग नोंदविल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्कावर २० टक्के व त्यावरील दंडाच्या रक्कमेवर ८० टक्के माफी राहणार आहे.

कार्यालये खुली राहणार

ज्या पक्षकार किंवा नागरिकांकडे मुद्रांक शुल्काची रक्कम थकीत आहे त्यांना अभय योजना २०२३ चा पहिला टप्पा म्हणजेच २९ फेब्रुवारीपर्यंत थकलेल्या मुद्रांक शुल्कावर २५ टक्के व त्यावरील दंडाच्या रक्कमेवर ९० टक्के माफीचा लाभ मिळणार आहे.

या योजनेचा लाभ देण्यासाठी शनिवारी व रविवारी शासकीय सुटीच्या दिवशी सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार आहेत.

लाभ घेण्याचे आवाहन

या दिवशी नागरिकांचे अर्ज स्वीकारणे, अभय योजनेतील प्रलंबित प्रकरणे, अर्ज निर्गत करणे व तद्अनुषंगिक कार्यवाही करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पक्षकार किंवा नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज २९ फेब्रुवारीपर्यंत या कार्यालयाकडे अथवा या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सहाय्यक दुय्यम निबंधक.

दुय्यम निबंधक कार्यालयांकडे सादर करून मुद्रांक शुल्क व दंडाच्या रक्कमेवर सवलतीनुसार रक्कम जमा करावी. तसेच शासनामार्फत सुरू असलेल्या अभय योजना २०२३ अंतर्गत मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजनेचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी गायकवाड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

SCROLL FOR NEXT