Sankalp picture of Freedom Savarkar Memorial
Sankalp picture of Freedom Savarkar Memorial esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सावरकर स्मारकाचे शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील पांझरा नदीकाठावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे शनिवारी (ता. २) सकाळी साडेनऊला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन होईल, अशी माहिती माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी दिली.

भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉ. सुभाष भामरे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल. (Dhule Bhumi Pujan of Savarkar Memorial on Saturday by Guardian Minister)

आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, भाजप विधानसभाप्रमुख अनुप अग्रवाल, भाजप महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप कर्पे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, अभियंता कैलास शिंदे, भाजप प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, माजी गटनेत्या वालीबेन मंडोरे, माजी उपमहापौर वैशाली वराडे, भाजप प्रदेश ओबीसी उपाध्यक्षा मायादेवी परदेशी, माजी स्थायी सभापती किरण कुलेवार. (latest marathi news)

माजी मनपा सभागृहनेत्या भारती माळी, प्रदेश सदस्या डॉ. माधुरी बाफना, भाजप महिला आघाडी अध्यक्षा वैशाली शिरसाठ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहतील. स्मारकासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून विकास शुल्क निधीतून पुतळा नूतनीकरण, सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

यासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पुतळा परिसर सुशोभीकरण, रेलिंग, छोटा बगीचा आदी कामांचा यात समावेश आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन कामाच्या सूचक व निमंत्रक माजी महापौर श्रीमती चौधरी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT