चिमठाणे : चिरणे (ता. शिंदखेडा) येथे रविवारी (ता. २२) चार घरे चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल, असे एकूण दोन लाख १७ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. सोमवारी (ता. २३) सकाळी घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. चिरणे येथील शेतकरी तुकाराम चौधरी (वय ७५) सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घराबाहेर आले असता, समोरील त्यांचे जुने घर उघडे दिसले म्हणून जवळ जाऊन पाहिले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. (Burglary in 4 houses in Chirne thief absconding with motorcycle)
घरात जाऊन पाहिले असता कपाटाचा दरवाजा उघडा होता. चोरट्याने तिजोरी वाकवून, कपाट फोडून मजुरीसाठी शिंदखेडा येथील हस्ती बँकेतून ७५ हजार, ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार, २० हजारांचे सोन्याचे तुकडे असे एकूण एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे व रमेश गोविंदा चौधरी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाट फोडून १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दोन झुबे व रोख आठ हजार, असे एकूण २० हजार रुपये चोरून नेले.
सखाराम काळू चौधरी यांच्या घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर विठ्ठल गोविंदा चौधरी यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले रोख दहा हजार चोरट्यानी चोरून नेले. सुभाष दिगंबर नगराळे यांनी त्याच्या घरासमोर त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची एच. एफ. डीलक्स मोटारसायकल (एमएच १८, सीए १२४० ) बारा हजार किमतीची मोटारसायकल चोरटयाने चोरून नेत तिच्यावरच बसून फरार झाले.
आठवड्यात दुसऱ्यांदा घरफोडी
आठ दिवसांपूर्वी खलाणे येथे याच पद्धतीने चार घरे चोरट्यांनी फोडली होती. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदखेडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी व हवालदार ईशी तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.