Dr. Subhash Bhamre esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : उमेदवार डॉ. सुभाष भामरे 15 कोटी रुपयांचे मालक; शपथपत्रात माहिती

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील महायुतीमधील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी सोमवारी (ता. २९) उमेदवारी अर्ज दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील महायुतीमधील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी सोमवारी (ता. २९) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात त्यांच्या शपथपत्रानुसार पती-पत्नीच्या नावे सुमारे १५ कोटी ६७ लाख ८१ हजार ५४८ रुपयांची स्थावर, जंगमसह स्व-मालमत्ता दर्शविण्यात आली आहे. (Dhule Candidate Dr. Subhash Bhamre owns Rs 15 crore)

एकूण दर्शविलेल्या १५ कोटी ६७ लाखांच्या रकमेत डॉ. भामरे यांच्या नावे सुमारे सात कोटी २० लाख १३ हजार ९६९ रुपये, तर पत्नीच्या नावे आठ कोटी ४७ लाख ६७ हजार ५७९ रुपयांचा समावेश आहे. डॉ. भामरे यांच्यावर साक्रीत एक गुन्हा दाखल असून, त्यात दोषारोप नाहीत.

त्यांच्याकडे खेडे (ता. धुळे) येथे प्रत्येकी सहा एकरचे दोन तुकडे, न्याहळोद (ता. धुळे) येथे पंधरा एकर शेतजमीन आहे. (Latest Marathi News)

एकूण दर्शविलेल्या पंधरा कोटींवर रकमेत २७ लाख २१ हजार ४९८ किमतीचे जडजवाहीर, सोने-चांदी, तर २८ हजारांचे हिरे समाविष्ट आहेत.

तसेच त्यात बँकेतील काही ठेवींसह डॉ. भामरे यांच्या हाती सहा लाख ८४ हजार, तर त्यांच्या पत्नीच्या हाती आठ लाखांची रोख रक्कम आहे. डॉ. भामरे यांच्याकडे दोन कार असल्याची नोंद शपथपत्रात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT