Abhinav Goyal while felicitating the agricultural assistant who has done remarkable work in the collector's office. Neighbor Vishal Narwade etc.
Abhinav Goyal while felicitating the agricultural assistant who has done remarkable work in the collector's office. Neighbor Vishal Narwade etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर कापसाची लागवड; पावणेचार लाख हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात तीन लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट असून त्यात दोन लाख १९ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड प्रस्तावित आहे. जिल्हा हा अवर्षणप्रवण असून पावसाचे पाणी अडविण्यासाठी पावसाळ्यापूर्वी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात यावीत. तसेच शेती उत्पन्न वाढीसाठी पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी व्यक्त केली. (Dhule Cotton cultivation on two lakh hectares in district)

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२४ ची आढावा बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक नवनाथ कोळपकर उपस्थित होते.

मका पिकाची लागवड

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कापूस पिकाला पर्याय म्हणून अधिकाधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड करावी. जेणेकरुन मका पिकावर प्रक्रिया उद्योग तसेच इथेनॉल सारखे पदार्थ तयार होण्यासाठी याचा उपयोग होवू शकेल. मका पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.

मका पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कंपनी प्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रात्याक्षिकांचे आयोजन करावे. गेल्या वर्षी जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे कृषी विभागाने १५ जूनपर्यंत जलसंधारणाची कामे लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात करावी. जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करून दर तीन महिन्यांनी कृषी सहायकांनी या केंद्राला भेट देवून त्याची तपासणी करावी.  (latest marathi news)

भात पिकावर भर द्यावा

साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भात पिकाच्या लागवडीवर अधिक भर देवून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न करावा. शेतकऱ्यांना कीड व रोगाची ओळख करुन देण्यासाठी शेतीशाळा आयोजित करण्यात याव्यात. खुरसणी तसेच भुईमूग क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करावेत.

ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही अशा शेतकऱ्यांची यादी गावस्तरावर प्रसिद्ध करण्यात यावी. रासायनिक खत विक्रेत्यांनी खताची विक्री शासकीय दरानेच करावी. जादा दराने विक्री, बियाणे, खते तसेच कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. युरियाचा वापर कमी होण्यासाठी नॅनो युरियाचा वापर वाढविण्यावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.

शेतकऱ्यांच्या मागणी नुसार खते व बियाणे विक्रेत्यांनी उपलब्ध करून द्यावे. सेंद्रिय खते, कंपोस्ट, गांडुळ खत, जिवाणू खते वापरण्यासाठी जनजागृती करावी. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करावे. शेतकऱ्यांना वैयक्तिक बांबू लागवड, फळबाग लागवड तसेच रेशीम शेतीसाठी प्रोत्साहित करावे, अशी सूचना श्री. गोयल यांनी दिली.

ई- पीक पाहणी

कृषी सहसंचालक वाघ म्हणाले की, यावर्षी खरीप हंगामात शंभर टक्के ई- पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणीसाठी अंगणवाडी सेविका, कृषी सहायक, तलाठी यांची मदत घ्यावी. बनावट बियाणे, खते व औषधे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना करावी. शेती उत्पादक कंपनी, बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी मानव विकास विभागास प्रस्ताव सादर करावे. शेतकऱ्यांमधून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करावे.  (latest marathi news)

फळबाग लागवड

कृषी निवष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी ५ भरारी पथके कार्यरत करण्यात आले असून १६ गुणवत्ता निरीक्षकांमार्फत जिल्हास्तरावर संनियंत्रण करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड योजना तसेच भाऊसाहेब पांडुरंग फुडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत सहा हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे.

यंदा कृषी विभागास यावर्षी पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. शिरसाट यांनी दिली. कर्ज वितरण, कृषि विद्युत जोडणी, पशुसंवर्धन विभाग, दुग्ध विकास विभागाचा आढावा घेण्यात आला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक, कीड परिस्थितीची माहिती देण्यासाठी माहितीपत्रक व पुस्तिकाचे अनावरण करण्यात आले. तसेच २०२३- २०२४ मध्ये उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या कृषी सहायकांचा प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला.

११ लाख पाकिटे बियाणे मागणी

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरसाट यांनी सांगितले, की खरीप हंगाम २०२४ साठी कापूस व सोयाबीन पीक वगळता १ लाख ३९ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रासाठी २२ हजार ३१२ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात २ लाख १९ हजार ८८० हेक्टर क्षेत्रासाठी बीटी कापूस बियाण्यासाठी ११ लाख पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी १.३३६ लाख टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. पैकी १.०५८ लाख टन खताचे आवंटन कृषी आयुक्तालयाने जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. तसेच ७१ हजार नॅनो युरियाचे आवंटन मंजूर केले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT