Crime News  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News: बुलढाण्याच्या व्यावसायिकाची छडवेलजवळ सिनेस्टाइल लूट; निजामपूर पोलिसांत 15 जणांविरुद्ध गुन्हा

Crime News : रोकड व एटीएम स्वॅप करून एकूण दोन लाख ८५ हजार रुपये लुटून नेले. पुन्हा त्यास गावाजवळ सोडत मोबाईल परत देत एक बनावट पाचशेची नोटदेखील दिली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : छडवेल (ता. साक्री) गावशिवारात बुलडाणा येथील व्यावसायिकाची सिनेस्टाइल लूट झाली. त्याला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. तसेच रोकड व एटीएम स्वॅप करून एकूण दोन लाख ८५ हजार रुपये लुटून नेले. पुन्हा त्यास गावाजवळ सोडत मोबाईल परत देत एक बनावट पाचशेची नोटदेखील दिली. हा गुन्हा बुलडाणा जिल्हा पोलिस ठाण्यावरून निजामपूर (ता. साक्री) पोलिसांकडे वर्ग झाला. (Dhule Crime Cinestyle robbery in Buldhana)

महम्मद शारीक महम्मद झाकिर (वय २८, रा. वॉर्ड १४, जुना जालना रोड, देऊळगावराजा, जि. बुलडाणा) याच्या फिर्यादीनुसार त्यास काही व्यक्तींनी ८ जुलैला दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवर बसवून छडवेल गावाच्या एका कच्च्या रस्त्याने दहा ते पंधरा किलोमीटर आत नेले.

त्याठिकाणी दुचाकींवर १५ जण आले. त्यांनी तुझ्यासोबत स्कॅम झाला असल्याचे सांगितले. त्यादरम्यान झाकिर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास मारहाण केली. तसेच मोबाईल हिसकावून घेत फोन-पे व गुगल-पेचा पासवर्ड देत नाही, तोपर्यंत मारहाण केली.

बॅगेतील ५० हजारांची रोकड, एटीएम व अन्य कागदपत्रे हिसकावून घेतली. अंगावरील कपडे फाडून टाकले. मोबाईलमधील डेटा ट्रान्स्फर करून घेतला. गळ्याला चाकू लावून व पिस्तुलाचा धाक दाखवत ठोकण्याची धमकी दिली. त्यामुळे महम्मद झाकिर याने मित्राकडून ऑनलाइन १५ हजार मागितले. (latest marathi news)

नंतर लुटारूंनी झाकिर याच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममधून स्वॅप मशिनवरून दोन लाख २० हजार काढले. सायंकाळी परत झाकिर याला दुचाकीवर बसवून छडवेल गावाजवळ आणून सोडले. तेथे मोबाईल परत दिला. तसेच त्यांच्याजवळील पाचशे रुपयांची नोट दिली. झाकिर नंदुरबार बसमध्ये असताना कंडक्टरला नोट दिली.

ती नकली असल्याचे कंडक्टरने सांगितले. नंतर मित्राकडून एका प्रवाशाच्या मोबाईलने सातशे रुपये मागवून झाकिर नंदुरबार येथून रेल्वेने महम्मद झाकिर छत्रपती संभाजीनगर व पुढे बसने देऊळगावराजा येथे गेला. त्याने बुलडाणा जिल्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा शून्य क्रमांकाने निजामपूर पोलिस ठाण्यात वर्ग झाला. याप्रकरणी संशयित १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT