Tractor and trolley seized from Tehsil office in case of illegal sand mining and illegal sand transportation from Tapi riverbed in Akkadse.
Tractor and trolley seized from Tehsil office in case of illegal sand mining and illegal sand transportation from Tapi riverbed in Akkadse. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टरमालकास दंडाची नोटीस; शिंदखेडा तहसीलदार सपकाळे यांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीपात्रातातून अवैध वाळू उत्खनन करून व अवैध वाळू वाहतूक करताना महसूल मंडळ अधिकारी स्वाती वाघ यांना पाटण गावाजवळ मंगळवारी (ता. २३) सायंकाळी ट्रॅक्टर सापडला होता. तो शिंदखेडा तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला होता. (Dhule Crime Fine notice to tractor owner in case of illegal sand transportation)

बुधवारी (ता. २४) तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी ट्रॅक्टरमालकला एक लाख ३२ हजार १५८ रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आल्याने अवैध गौणखनिज माफियांमध्ये खबराट निर्माण झाली आहे. पाटणजवळ वरसूस (ता. शिंदखेडा) येथील भुरा कोळी यांच्या मालकीचे जॉन डियर कंपनीचा (एमएच १८, झेड ७९४१).

हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर व त्याला जोडलेल्या निळ्या रंगाच्या ट्रॉलीतून सुमारे सव्वा ब्रास वाळू गौणखनिजाची विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना तथा अवैधरीत्या वाहतूक करत असताना महसूल पथकास मंगळवारी सायंकाळी आढळले. गौणखनिज रॉयल्टीबाबत वाहनचालकास व मालकासह विचारणा केली असता ‘तुम्ही कोणत्याही प्रकारची रॉयल्टी तथा परवानगी सादर न केल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली शिंदखेडा तहसीलमध्ये जप्त करण्यात आले आहे.

ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाई पूर्ण होईपर्यंत जप्त करण्यात येत आहे,’ असे सांगितले. बुधवारी तहसीलदार सपकाळे यांनी वरसूस येथील भुरा कोळी यांना अनधिकृत गौणखनिज वाहतूक व साठवणूक प्रकरणी दंडाची नोटीस जारी केली. महसूल कायद्याच्या तरतुदीनुसार दंडास पात्र असून, त्यानुसार तुमच्याकडून एक लाख ३२ हजार १५८ रुपये वसूल का करण्यात येऊ नयेत.

याचा लेखी खुलासा सबळ पुराव्यासह नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत तहसीलदार सपकाळे यांच्या समक्ष हजर राहून सादर करावा. खुलासा मुदतीत सादर न केल्यास आपणास नोटीस मान्य आहे, असे गृहीत धरून पुढील नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT