Matka Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime: अवैध मटका व्यावसायिकांच्या मुसक्या आवळल्या! नवापूर पोलिसांची 5 जणांवर कारवाई; आमलाण शिवारात रंगला होता डाव

Crime News : ही कारवाई मंगळवारी (ता. ९) दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली असून, नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : आमलाण (ता. नवापूर) शिवारातील शेताच्या बांधावरील झाडाजवळ सट्ट्याच्या आकड्यावर जुगाराचा अवैध व्यवसाय करणाऱ्या पाच जणांना पकडले. ही कारवाई मंगळवारी (ता. ९) दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली असून, नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Nandurbar Crime Illegal Matka businessmen arrested)

नवापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी आमलाण (ता. नवापूर) गावाच्या शिवारातील दाविद विनायक वसावे याच्या शेतातील बांधाजवळील एका लिंबाच्या झाडाजवळ सार्वजनिक जागी काही व्यक्ती लोकांकडून सट्ट्याच्या आकड्यावर पैसे लावून व घेऊन टाइम बाजार नावाचा मटका अंक सट्टा जुगाराचा खेळ खेळत व खेळवीत आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्याअनुषंगाने नवापूर पोलिस पथकाने मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दाविद विनायक वसावे याच्या शेतात धाड टाकली.

यात शेताच्या बांधाजवळील लिंबाच्या झाडाजवळ दाविद विनायक वसावे (वय ४०), दीपक जयंत वसावे (३३), सुरेश सुपड्या काथुड (४५, तिघे रा. आमलाण), सिद्धल बाबू काथुड (२७, रा. लिबा सोसायटी, ता. उच्छल, जि. तापी), सुनील विन्या वळवी (३०, रा. बेटकी, ता. नवापूर) हे पाच जण सट्ट्याच्या आकड्यावर पैसे लावून व घेऊन टाइम बाजार नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळले. त्यांच्याकडून तीन हजार १५० रुपयांची रोकड व दोन लाख ६० हजार किमतीच्या मोटारसायकली असा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

याबाबत पोलिस शिपाई जितेंद्र कोकणी यांनी नवापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध दिलेल्या प्रथम खबरीवरून जुगार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाई पथक

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस उपनिरीक्षक, मनोज पाटील, विशाल सोनवणे, भाऊसाहेब लांडगे, पोलिस शिपाई जितेंद्र कोकणी, दीपक पाटील, किशोर वळवी, दिनेश बाविस्कर यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT