Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : व्यापाऱ्याला जंगलात बोलावत लुटले; जामद्यातील 8 जणांवर दरोड्याचा गुन्हा

Dhule Crime : पाइप विक्रीच्या बहाण्याने हट्टी खुर्द (ता. साक्री) शिवारातील जंगलात बोलावून जळगाव येथील व्यापाऱ्याला लुटण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : पाइप विक्रीच्या बहाण्याने हट्टी खुर्द (ता. साक्री) शिवारातील जंगलात बोलावून जळगाव येथील व्यापाऱ्याला लुटण्यात आले. मारहाण करीत त्याच्याकडून रोकडसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हिसकावून घेत त्याला रस्त्यावर सोडून दिले. या प्रकरणी पाच दिवसांनंतर जामद्यातील संशयित आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. याबाबत जावेद आबीद देशमुख (वय ४८, रा. रजा कॉलनी, मेहरूण, जळगाव) या व्यापाऱ्याने गुरुवारी (ता. ४) निजामपूर पोलिसांना आपबीती सांगितली. (Dhule Crime Merchants was called to forest and robbed)

त्यानुसार त्यांना ३१ मार्चला दुपारी साडेतीनच्या सुमारास चरणदास भोसले याच्यासह इतरांनी पाइप विक्री करण्याच्या बहाण्याने हट्टी खुर्द शिवारातील जंगलात नेले. तेथे मारहाण करीत त्यांच्याकडील २० हजारांची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, दोन लाख २८ हजारांची रोकड व दहा हजारांचा मोबाईल असा एकूण तीन लाख १६ हजारांचा मुद्देमाल काढून घेतला.

तसेच त्यांना दुचाकीवरून रस्त्यावर सोडून दिले. या प्रकरणी संशयित चरणदास भोसले याच्यासह मनीष आप्पा भोसले, अवतार पोपट पवार, सुदेश खोकट्या चव्हाण, सचिन देसाई ऊर्फ इरफान, भय्याजी मकाला पवार, संजयलाल डिबू भोसले, आरेश संकीलाल पवार (सर्व, रा. जामदा, ता. साक्री) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT