Dattatraya Shinde, Ashok Patil, Nitin Mohne
Dattatraya Shinde, Ashok Patil, Nitin Mohne esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : सोन्याची बिस्किटे, दागिने, खरेदीखत जप्त; लाचप्रकरणी ‘एलसीबी’ पोलिस निरीक्षकाच्या घरी सापडले घबाड

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करण्याप्रकरणी येथील ‘एलसीबी’च्या पोलिस निरीक्षकाने दोन हवालदारांमार्फत दोन लाखांची लाच मागितली. तडजोडीअंती दीड लाखाची लाच स्वीकारताना दोघा हवालदारांना अटक झाली. चौकशीत पोलिस निरीक्षकाने सांगितल्यानुसार लाच स्वीकारली गेल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. (Dhule crime police inspector of LCB demanded bribe of two lakhs through two constables)

या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षकाच्या घरी घेतलेल्या झडतीत सोन्याची बिस्किटे, दागदागिने, चांदीची भांडी आणि स्थावर मालमत्तेचे खरेदीखत असा एकूण दोन कोटी ३५ लाख किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दोंडाईचा येथील माजी नगरसेवकाने (वय ३५) तक्रार केल्यावर ही कारवाई झाली आणि लाचखोरांचे पितळ उघडे पडले. तक्रारदार माजी नगरसेवकावर राजकीय आकसापोटी अनेक गुन्हे दाखल आहेत. ही माहिती संकलित करून ‘एलसीबी’चा हवालदार नितीन आनंदराव मोहने (रा. प्लॉट नंबर ५८, ग. द. माळी सोसायटी, देवपूर, धुळे), अशोक साहेबराव पाटील (रा. प्लॉट नंबर २५, मधुमंदा सोसायटी, नकाणे रोड, देवपूर, धुळे) याने तक्रारदाराला गाठले.

दोन लाखांची लाच हवी

लोकसभेची निवडणूक, आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा पोलिस ठाण्याकडून प्रस्ताव मागविला जाईल आणि जिल्ह्यातून हद्दपार केले जाईल, असे दोघा हवालदारांनी तक्रारदार माजी नगरसेवकाला सांगितले. ही कारवाई टाळायची असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, असेही हवालदारांनी सांगितले.

उभयंतांमध्ये तडजोडीअंती दीड लाख रुपये लाच देण्याचे ठरले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे (रा. बीड) याच्या सांगण्यानुसार हवालदार मोहने, पाटील याने दोंडाईचा येथे सोमवारी (ता. १) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जैन मंदिराजवळ तक्रारदाराकडून दीड लाख रुपये लाच स्वीकारली.

दोंडाईचात यशस्वी सापळा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, हेमंत बेंडाळे, पथकातील कर्मचारी राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रशांत बागूल, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी हवालदार मोहने, पाटील यास दोंडाईचात पकडले.

नंतर उपअधीक्षक पाटील यांनी एलसीबीच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. तेथे पोलिस निरीक्षक शिंदे यास चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात यावे लागेल, असे सांगितले. तेथे चौकशीअंती शिंदे याच्या सांगण्यावरून दोघा हवालदारांनी लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संशयित तिघांविरुद्ध दोंडाईचा येथे गुन्हा दाखल झाला.

पोलिस कोठडीत रवानगी

अटकेनंतर संशयित तिघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी कारवाईत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घाटगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक शाखेचे उपअधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

शिंदे याच्या घरी सापडले घबाड

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री संशयित शिंदे याच्या घराची झडती घेतली. त्यात सुमारे ६० लाख किमतीची सोन्याची बिस्किटे, दागिने, तसेच सुमारे ७५ हजार किमतीची चांदीची भांडी व दागिने, त्याच्या कुटुंब व इतर व्यक्तींच्या नावे असलेल्या सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचे खरेदीखत जप्त करण्यात आले.

या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी तपास करीत आहेत. लाचप्रकरणी नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक- ०२५६२ २३४०२०, टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT