Pradeep Pardeshi esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe News : 1 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापकाला पकडले

Dhule Bribe : सुरत महामार्गावरील कुसुंबा (ता. धुळे) येथील आदर्श शाळेतील मुख्याध्यापकाला सहकारी शिक्षिकेकडून अवघ्या एक हजाराची लाच घेताना पकडण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Bribe News : सुरत महामार्गावरील कुसुंबा (ता. धुळे) येथील आदर्श शाळेतील मुख्याध्यापकाला सहकारी शिक्षिकेकडून अवघ्या एक हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. प्रदीप पुंडलिक परदेशी असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. १९) सकाळी ही कारवाई केली. कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल येथील प्रदीप परदेशी हा मुख्याध्यापक आहे. (Dhule Crime principal was caught while accepting bribe of 1 thousand)

त्याने शाळेत आयोजित उपक्रमांसाठी खर्च झाल्याचे निमित्त करत शाळेतील सर्व कार्यरत शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ८०० रुपये जमा करण्याचे बैठक घेत सांगितले. हजार रुपये देण्यास तक्रारदार उपशिक्षिकेने विरोध दर्शविला. त्यामुळे मुख्याध्यापकाने पैसे दिल्याशिवाय हजेरी नोंदवहीवर सही करायला तक्रारदार उपशिक्षीकेला मज्जाव केला.

संबंधित उपशिक्षिकेने मुख्याध्यापक परदेशी हा एक हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील कार्यालयाकडे केली. (latest marathi news)

तक्रारीची पडताळणी करत विभागाच्या पथकाने सापळा रचला. यात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास मुख्याध्यापक प्रदीप परदेशी स्वतःच्या कार्यालयात एक हजाराची लाच घेताना पकडला गेला.

या विभागाचे येथील पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, मंजीतसिंह चव्हाण, रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली. संशयित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT