Nagraj Patil, Bhausaheb Patil, Kiran Patil, Pitambar Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe Crime : सरपंच पतीसह चौघे ACBच्या जाळ्यात; फागणेचा ग्रामविकास अधिकारी, लिपिक, रोजगार सेवकाचा समावेश

Crime News : त्यांनी तक्रारदाराच्या घराच्या नमुना क्रमांक ८ वरील अतिक्रमण नियमानुकूल झाल्याची नोंद करून अद्ययावत उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Bribe Crime : घराचा उतारा देण्याच्या मोबदल्यात चार हजारांची लाच स्वीकारताना फागणे (ता. धुळे) येथील सरपंच पती, ग्रामविकास अधिकाऱ्यासह चौघांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी (ता. १८) दुपारी ही कारवाई झाली. लाचखोरांमध्ये फागणे येथील ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील, सरपंच पती नगराज हिलाल पाटील, लिपिक किरण श्याम पाटील व रोजगार सेवक पीतांबर शिवदास पाटील यांचा समावेश आहे. (Dhule Crime Sarpanch husband four arrested by ACB)

तक्रारदाराच्या घराचे अतिक्रमण नियमानुकूल झाल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होऊन अद्ययावत घराचा उतारा (नमुना क्रमांक ८) मिळण्याकामी तक्रारदार वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील व सरपंच पती नगराज पाटील यांची फागणे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन भेट घेतली.

तेव्हा त्यांनी तक्रारदाराच्या घराच्या नमुना क्रमांक ८ वरील अतिक्रमण नियमानुकूल झाल्याची नोंद करून अद्ययावत उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

(latest marathi news)

त्यानुसार १६ जुलैला एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता सरपंच पती नगराज पाटील व रोजगार सेवक पीतांबर पाटील यांनी तक्रारदाराला ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना चार हजार रुपये लाच देण्याकरिता प्रोत्साहित केले. त्यानुसार गुरुवारी (ता. १८) ग्रामविकास अधिकारी पाटील याने तक्रारदाराकडे चार हजार रुपये लाचेची मागणी करत लाचेची रक्कम लिपिक किरण पाटील याच्या हस्ते स्वीकारल्याने चौघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.

चौघा लाचखोरांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT