Dhule crime Stones were pelted at police station esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 7 जणांना न्यायालयीन, तर 4 जणांना पोलिस कोठडी; शंभर-दीडशे जणांनी केला होता हल्ला

Dhule News : वरपाडे (ता. शिंदखेडा) येथे मुलीस धक्का लागल्याच्या निमित्ताने दोन गटांत शुक्रवारी (ता. ३१) रात्री वाद निर्माण झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : वरपाडे (ता. शिंदखेडा) येथे मुलीस धक्का लागल्याच्या निमित्ताने दोन गटांत शुक्रवारी (ता. ३१) रात्री वाद निर्माण झाला होता. शिंदखेडा पोलिस ठाण्यात दोन्ही गट समोरासमोर आल्याने संशयित आरोपीस ताब्यात द्या, अशी मागणी मुलीच्या नातेवाइकांनी केली. मात्र पोलिसांनी नकार दिल्याने १००-१५० जणांनी पोलिस ठाण्यावर व शासकीय वाहनावर दगडफेक केली होती. (Dhule crime Stones were pelted at police station)

पोलिसांनी शुक्रवारी सात जणांना ताब्यात घेतले होते. त्याची दोन दिवसांची पोलिस कोठडी सोमवारी (ता. ३) संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत, तर शनिवारी (ता. १) दोन जणांना ४ जूनपर्यंत, तर रविवारी (ता. २) दोन जणांना ५ जूनपर्यंत शिंदखेडा न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. संशयित विशाल देवा ठाकरे, महेंद्र सुकदेव सोनवणे.

जितेंद्र तुकाराम मालचे, अंबर सुरसिंग मोरे, लखन उखा ठाकरे, गोरख रवींद्र मालचे व कैलास सुक्राम पवार (सर्व रा. शिंदखेडा) यांना शनिवारी (ता. १) शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली होती.

त्यांची मुदत संपल्याने सोमवारी शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. रविवारी विजय देवीदास महाले (वय २६, रा. बंगला भिलाटी, ता. शिंदखेडा) व नरेश ऊर्फ नाट्या नारायण कापुरे (१९, रा. सिद्धार्थनगर, शिंदखेडा) यांना शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता मंगळवार (ता. ४)पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

कैलास भगवान मालचे-भिल (वय ३६) व सुरेश श्यामराव ठाकरे-भिल (३२, दोघे रा. वरपाडे, ता. शिंदखेडा) यांना सोमवारी (ता. ३) शिंदखेडा न्यायालयात तपासी अधिकारी उपनिरीक्षक मिलिंद पवार यांनी हजर केले असता बुधवार (ता. ५)पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टाचा आदेश; बलात्कार प्रकरणातील दोषी तरुण तेजपालला दोन आठवड्यांत शरणागती पत्करण्याचे निर्देश

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT