A team of 'LCB' present with the suspect in custody in the ganja case. ESAKAL
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : गांजा विक्रीसाठी फिरणारा गोव्यातील संशयित ताब्यात

Dhule Crime : शहरात गांजाची विक्री करण्यासाठी फिरणाऱ्या गोव्यातील संशयित तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : शहरात गांजाची विक्री करण्यासाठी फिरणाऱ्या गोव्यातील संशयित तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (ता. १२) सकाळी केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवरून सोनू अनिल चौधरी (वय २९, रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश व ह.मु. म्हापसा, गोवा) या संशयिताला पकडले. (Dhule Crime)

त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात मानवी मेंदूवर घातक परिणाम घडवून आणणारा गांजा मिळून आला. पोलिसांनी २६ हजार ४०० रुपयांचा दोन किलो २०० ग्रॅम गांजा व पाच हजारांचा मोबाईल जप्त केला.

चौकशीत त्याने शंकर खरे (रा. सेंधवा, मध्य प्रदेश) याच्याकडून गांजा विकत घेऊन विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. या प्रकणी तुषार सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, योगेश राऊत, संदीप सरग, प्रकाश सोनार, तुषार सूर्यवंशी, हेमंत बोरसे, बापू वाघ, योगेश चव्हाण, संदीप पाटील, योगेश जगताप, सुशील शेंडे, कैलास महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हस्तांदोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : भारतात प्रवेश करणाऱ्या 79 कैद्यांना अटक

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT