After breaking into the Trimurti Agro Services shop near the National Highway on Dahivel Marg, police tracking the thief with the help of dog squad. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime: साक्रीत राष्ट्रीय महामार्गालगतचे ॲग्रो दुकान चोरट्यांनी फोडले; सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास; भामटा सीसीटीव्हीत कैद

Dhule News : या घटनेबाबत दुकानमालक सचिन निंबा काकुस्ते यांनी पोलिसांत फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

साक्री : येथील राष्ट्रीय महामार्गालगत साक्री-दहिवेल मार्गावर असणारे त्रिमूर्ती ॲग्रो सर्व्हिसेस हे बियाणे विक्री दुकान चोरट्याने फोडत सुमारे एक लाख २५ हजार ४१६ रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेबाबत दुकानमालक सचिन निंबा काकुस्ते यांनी पोलिसांत फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. (Dhule Crime thieves broke into agro shop along national highway)

साक्री-दहिवेल मार्गावरील नवापूर रोडलगतच्या त्रिमूर्ती ॲग्रो सर्व्हिसेस नावाचे बियाणे विक्री दुकान चोरट्यांनी गुरुवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास लक्ष्य केले. चोरट्याचा दुकानातील प्रवेश दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला असून, गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान अज्ञात व्यक्ती दुकानाच्या शटरचा पत्रा उचकावून आत प्रवेश करून दुकानातील बियाणे, औषधांची पाहणी करत असल्याचे त्यात दिसून आले.

तसेच दुकानातील एक लाख ११ हजार ४५६ रुपये किमतीचे राशी सीड्स व अजित सीड्स कंपनीचे कपाशीच्या बियाण्याची १२९ पाकिटे, सहा हजार ९६० रुपये किमतीचे आशा ॲग्रो सायन्स कंपनीचे मक्याच्या बियाण्याची चार पाकिटे तसेच गल्ल्यातील सात हजारांची रोकड असा सुमारे एक लाख २५ हजार ४१६ रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला. (latest marathi news)

याबाबत दुकानमालक सचिन काकुस्ते सकाळी दुकानात आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वानपथकाच्या मदतीनेदेखील चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत श्री. काकुस्ते यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT