उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात १२२ गावांनी कोरोनाला थोपविले वेशीबाहेर

परदेशातूनही अनेक जण सुरक्षितस्थळी म्हणून मूळ धुळे जिल्ह्यात परतले.

निखील सुर्यवंशी


धुळे ः दीड वर्षापासून विविध संकटात टाकणाऱ्या संसर्गजन्य कोरोना विषाणूने (Coronavirus) अद्यापही आपली पाठ सोडलेली नाही. असे असले तरी जिल्ह्यातील ५६८ पैकी १२२ गावांनी (Village) कोरोनाला वेशीबाहेरच थोपविण्यात यश मिळविले आहे. तेथील ग्रामस्थांनी मास्कचा नियमित वापर, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे, स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, आहार-विहार आणि व्यायामावर भर देत रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवल्याने ही किमया घडू शकली.

(dhule district one hundred and twenty two villages not corona patients)

कोरोनाला थोपविणाऱ्या ११२ गावांमध्ये अद्याप एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. देशात मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्ग होण्यास सुरवात झाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा जिल्ह्यावरही परिणाम झाला. भीतीपोटी अनेकांनी इतरत्र स्थलांतर केले, तर उद्रेक झालेल्या मुंबई (Mumbai) , पुण्यासह (Pune) काही जिल्ह्यांतील अगदी परदेशातूनही अनेक जण सुरक्षितस्थळी म्हणून मूळ धुळे जिल्ह्यात परतले. मात्र, कोरोनाने जिल्ह्याला लपेटले. पहिल्या टप्प्यात अनेकांचे बळी गेले.

सामूहिक प्रयत्नांचे यश
फेब्रुवारी आणि मार्चमधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना या विषाणूची बाधा झाली. त्यातही अनेकांचे बळी गेले. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली. अनेक गावांनी बाहेरील व्यक्तीला प्रवेश नाकारला. गावात दक्षता बाळगण्याचे प्रयत्न केले. यात काही आठवड्यांपासून सामूहिक प्रयत्नांमुळे स्थितीत बदल होताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील काही गावांनी सामूहिक प्रयत्नातून कोरोनाला गाव सीमेवरच थोपविण्यात यश मिळविले.

नियमांच्या पालनावर कटाक्ष
जिल्ह्यात ५६८ पैकी १२२ गावांमध्ये अद्याप कोरोनाला प्रवेश करता आला नाही. संबंधित गावातील नागरिकांनी परिसराची स्वच्छता राखतानाच शारीरिक अंतर पाळणे, मास्कचा नियमित वापर, पुरेशा प्रमाणात व्यायाम, योग्य आहार-विहार, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे आदी नियमांच्या पालनावर कटाक्षाने भर दिला. त्यात रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवली. त्याचे फलीत कोरोनाला संबंधित गावात प्रवेशबंदी राहिली. नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी स्वत:सह परिसराची स्वच्छता ठेवावी, संपर्क टाळावा, मास्कचा नियमित वापर करावा, असे स्पष्टीकरण जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिले.

लसीकरणाची स्थिती
जिल्ह्यात गुरुवारी (ता. ३) झालेल्या तपासणीत ग्रामीण क्षेत्रात केवळ ११ कोरोनाबाधित आढळले. या वर्षात आजपर्यंत ४९६ जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण क्षेत्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर पोचले आहे. जिल्ह्यातील दोन लाख ४२ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस देण्यात आला असून, ६७ हजार नागरिकांना दुसरी डोस देण्यात आल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. नागरिकांनी निकष व नियोजनानुसार लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.


कोरोनामुक्त गावे अशी...
जिल्हा आरोग्याधिकारी नवले यांनी सांगितले, की साक्री तालुक्यातील २५७ पैकी ७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. शिंदखेडा तालुक्यातील ११८ पैकी १८, शिरपूर तालुक्यातील ११७ पैकी १८, तर धुळे तालुक्यातील ८३ पैकी ११ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT