Youth trying to alleviate the shortage by bringing water with a bullock cart. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Drought News : पाणीटंचाईग्रस्त गावांचे कोणी श्रेय घेईल का? टंचाईग्रस्त गावांचा दर वर्षीच पाण्यासाठी लढा

Dhule Drought : धुळे जिल्ह्यात विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी पुढे येणाऱ्या पुढाऱ्यांची कमी नाही. पण पाणीटंचाईग्रस्त गावांची टंचाई दूर करण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : धुळे जिल्ह्यात विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी पुढे येणाऱ्या पुढाऱ्यांची कमी नाही. पण पाणीटंचाईग्रस्त गावांची टंचाई दूर करण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत. किंबहुना आम्ही टंचाई निवारण केली, असे छातीठोकपणे सांगण्याची धमक कोणत्याही लोकप्रतिनिधीकडे असल्याचे जाणवत नाही. टंचाईग्रस्त गावे दर वर्षीच पाण्यासाठी लढा देत आहेत. (Dhule Drought News)

थोड्याफार उपाययोजनांवर लाखाचा खर्च वर्षनुवर्षे होऊनही टंचाई निवारण झालेली नाही. शासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करून घेणे आवश्यक आहे. विकासकामांचे श्रेय घेणारे लोकप्रतिनिधींसह पाणीटंचाईग्रस्त गावांचे कोणी श्रेय घेईल का, अशा उपहासात्मक चर्चाही सुरू आहेत.

तीच ती गावे टंचाईग्रस्त

तालुक्याला दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. जिल्ह्यातील १०७ गावांतील कूपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. दर वर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाई जाणवायला सुरवात होणाऱ्या गावांची संख्या अधिक आहे. मोठ्या गावांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून बाराही महिने पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

उर्वरित गावांमध्ये उन्हाळा सुरू झाला म्हणजे टंचाईच्या झळा सुरू होतात. तालुक्यातील १६० पैकी किमान ११० गावांमध्ये टंचाई असतेच. विहिरी, कूपनलिका अधिग्रहीत करण्यासाठी धावपळ होत असते. तीच ती गावे टंचाईचा सामना करताना आढळतात. (Latest Marathi News)

थातुरमातुर योजना

खेड्यापाड्यात व शेती शिवारात विहीर व कूपनलिका खोलवर गेल्या आहेत. बागायती शेतीसाठी विहिरी व कूपनलिकांची संख्या मोठी वाढत चालली आहे. सततचा दुष्काळ व पाणी उपसण्याचे मोठे प्रमाण यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत चालले आहे. शासनही अनुदानावर विहिरी देण्याचे प्रमाण वाढले आहे. ते योग्य असले तरी पाणीउपाशावर मोठा परिणाम झाला आहे.

लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे टंचाईकडे अधिक लक्ष नसते. पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. नेहमीच्याच टंचाईग्रस्त गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाच्या आठ-दहा लाखांच्या थातुरमातुर योजना देत असते अन पुन्हा उन्हाळा आला म्हणजे पुन्हा टंचाईचाच सामना करावा लागतो. टंचाई सोडविण्यासाठी सजगपणे पाहणे आवश्यक आहे.

ग्रामस्थांनीच घ्यावा पुढाकार

ग्रामस्थही टंचाई सोडविण्यासाठी आळसावलेले आहेत. शासन पाण्याची सोय करेल या आशेवर मतदान करतात. पण आडातच नाही तेव्हा पोहऱ्यात कोठून येणार? त्यासाठी टंचाई सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे सरसावणे आवश्यक आहे. विहिरी व कूपनलिकांचे पुनर्भरण केले पाहिजे. गावालगतचे व शेतशिवारातील नदीनाले श्रमदान व लोकवर्गणीतून कोरले पाहिजेत. पाणी फाउंडेशनच्या उपाययोजनांमध्ये सहभागी झाले पाहिजे. एकंदरीत शाश्वत उपाययोजना करून पाण्याची समस्या पिण्यासह शेतशिवारासाठीही सोडवून घेण्याची समज ज्या दिवशी बळ धरेल तो सुदीन ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

R. Madhvan Parenting Tips: "मुलांना मोकळा वेळ देऊ नका!" आर. माधवनने दिल्या यशस्वी आणि शिस्तबद्ध मुलं घडवण्याच्या टिप्स

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Irregular Sleep Schedules: ८ तास झोपल्यानंतरही बिघडू शकतं का आरोग्य? जाणून घ्या झोपेचं योग्य वेळापत्रक का गरजेचं

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

SCROLL FOR NEXT