Fishing Business (file photo)
Fishing Business (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Drought News : सोनगीर परिसरात मासेमारी ठप्प; धरणे, तलाव एप्रिलमध्येच कोरडे

एल. बी. चौधरी

सोनगीर : येथे व परिसरात दुष्काळामुळे चार धरणे व तलाव एप्रिलमध्येच कोरडे पडल्याने यंदा परिसरातील तलाव व धरणांत मासेमारी पूर्णत: ठप्प असून, मच्छीमारांवर बेकारी व उपासमारीचे संकट कोसळले आहे. दरम्यान, माशांच्या दरातही वाढ झाली आहे. कमी पाण्यामुळे यंदा धरणात मत्स्यबीज सोडलेच नसल्याने तालुक्यातही बहुतांश मासेमारी बंद आहे.

परिसरात येथील पाझर तलाव, बाभळे (ता. शिंदखेडा)जवळील जामफळ धरण, डोंगरगाव (ता. शिंदखेडा) येथील सोनवद लघु प्रकल्प, देवभाने (ता. धुळे) येथील धरण, बुरझड (ता. धुळे) येथील सातपायरी धरण आहे. येथील पाझर तलाव भरल्यास दररोज एक क्विंटल मासे मिळतात. यंदा पावसाअभावी तलावाचे स्रोत आटले. तलाव पूर्ण कोरडा पडला असून, मासेमारी ठप्प झाली. गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती आहे.

सोनगीरपासून तीन किलोमीटरवर जामफळ धरण असून, दररोज सुमारे दोन क्विंटल मासे मिळत होते. सध्या धरणात केवळ मृत साठा आहे. धरणाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने पाणी संचय केला जात नाही. मत्स्यबीज सोडण्यात न आल्याने येथेही मासेमारी ठप्प आहे. डोंगरगाव येथील सोनवद धरणात दोन वर्षांपूर्वी चार लाख मत्स्यबीज सोडले होते.

दररोज सुमारे दीड क्विंटल मासे मिळायचे. गेल्या वर्षी धरणात मृत साठा असल्याने मत्स्यबीज न सोडण्याचा निर्णय येथील कालिका मच्छीमार सोसायटीने घेतला. त्यामुळे तेथेही मासेमारी ठप्प आहे. दरम्यान, सोनवद धरणात मासेमारीवरून कालिका सोसायटी व स्थानिक मासेमार यांच्यात वाद सुरू आहेत. न्यायालयाचा निकाल लागूनही वाद मिटला नाही. (Latest Marathi News)

देवभाने धरणातही पाण्याअभावी मासेमारी ठप्प आहे. बुरझड येथील सातपायरी धरणात मत्स्यबीज सोडण्यात आले होते. मात्र फारसे मासे मिळाले नाहीत. दररोज ३० ते ४० किलो मासे मिळायचे तेही सध्या बंद आहे. परिसरासाठी दररोज आठ ते दहा क्विंटल मासे आवश्यक आहेत. मासेमारी सुरू असतानादेखील मासे पुरत नाहीत. पाच-सहा क्विंटल रोहू जातीचे मासे हैदराबाद, उकई (गुजरात) येथून, तर समुद्री बाम मुंबईहून धुळे व तेथून परिसरात आणतात.

यंदा परिसरातील धरणांत मिळणारे कटला, आफ्रिका, बोली, कोंबडा मासे, ओले बोंबील, वाव ही चवदार मासळी मिळत नसल्याने खवय्यांना बाहेरील बर्फात आणलेल्या माशांवर अवलंबून राहावे लागत आहे. मासेमारी ठप्प असल्याने परिसरातील सुमारे शंभर मच्छीमारांना बेकारीला तोंड द्यावे लागत असून, काहींनी मिळेल ते काम स्वीकारले आहे.

दरात वाढ

दरम्यान, माशांच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसत असून, २०० ते २४० रुपये किलो मिळणारे मासे २४० ते २८० रुपये मिळत आहेत. त्यामुळे मटण, चिकनच्या दरातही वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT