JCB during lifting of sludge. Electric pump for pumping dead stock esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Drought News : ‘सोनवद’मधील मृतसाठ्यावर बागायत वाचविण्याची धडपड; मच्छीमारांची उपासमार

Dhule Drought : या प्रकल्पात मृतसाठा असून, काही आदिवासी या साठ्यात अल्पशी मासेमारी करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जगन्नाथ पाटील -सकाळ वृत्तसेवा

Dhule Drought News : येथून सहा किलोमीटरवरवर सोनवद प्रकल्प (ता. शिंदखेडा) आहे. या प्रकल्पात मृतसाठा असून, काही आदिवासी या साठ्यात अल्पशी मासेमारी करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकरी स्वखर्चाने गाळ उचलत आहेत. गाळ उचलण्यामुळे प्रकल्पातील साठ्याची संचयक्षमता वाढणार आहे. शेतकरी मृतसाठा उचलून बागायती वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ( Struggle to save plantation on dead stock in Sonwad )

धुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी सोनवद प्रकल्प असून, तो शिंदखेडा तालुक्यातील मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे डोंगरगाव, वरखेडे, कंचनपूर, वाघोदे, अजंग आदी गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. मात्र या वर्षी शेतीला एकही आवर्तन सुटले नाही. दुष्काळी स्थितीमुळे प्रकल्पात सप्टेंबरमध्ये केवळ ३० टक्के साठा होता. परिणामी एकही आवर्तन सुटू शकले नाही. रब्बीच्या हंगामावर मोठा परिणाम झाला. शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला.

मृतसाठ्यावर पिके

प्रकल्पात जानेवारीपासून मृतसाठा आहे. शेतकऱ्यांची वीजपंपाच्या सहाय्याने मृतसाठा उचलून बागायती पिके घेण्याची धडपड सुरू आहे. (latest marathi news)

मासेमारीवर मोठा परिणाम

या प्रकल्पात मासेमारी करून उदरनिर्वाह करणारे बरेच आदिवासी आहेत. मृतसाठ्यावर मासेमारी करून उदरनिर्वाह भागत नसल्याने मच्छीमार नाराज आहेत. त्यांना दुसरा व्यवसाय शोधावा लागला आहे.

गाळ उचलण्याची धडपड

या प्रकल्पातील गाळ उचलणे सुरू आहे. शेतकरी स्वखर्चाने गाळ उचलून शेतात पसरवीत आहेत. गाळ उचलला जात असल्याने पाण्याची जलसंचयन क्षमता वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa Nightclub Fire Update : लुथरा बंधू थायलंडमधून पळून जाऊ शकणार नाहीत, भारत सरकारने रद्द केला पासपोर्ट

Koyna Earthquake: कोयनेतील ‘त्या’ काळरात्रीला ५८ वर्षे पूर्ण! 'भूकंपाच्या आठवणी आजही कायम'; निसर्गाच्या उद्रेकामुळे शेकडोंनी गमावले होते प्राण..

Latest Marathi News Live Update : कोर्टात सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे बच्चू कडू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी

Pune News : राज्य सहकारी बँकेत शिपाई, चालक भरतीही आयबीपीएसमार्फत

Sahyadri Tiger: 'ताडोबातील आणखी एक वाघीण सह्याद्रीत'; आईपाठोपाठ मुलीचेही स्थानांतर, चांदोलीच्या सोनरलीत वास्तव्य !

SCROLL FOR NEXT