social media esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : निवडणूक यंत्रणेकडून सोशल मीडियावर करडी नजर

Dhule News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांना समाज माध्यमे, सोशल मीडियावर निवडणूक प्रचारासंबंधी जाहिरातींचे प्रमाणीकरण करावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांना समाज माध्यमे, सोशल मीडियावर निवडणूक प्रचारासंबंधी जाहिरातींचे प्रमाणीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी स्थापन समिती हे कार्य करेल. निवडणुकीचा काळ असल्यामुळे आदर्श आचारसहिंता लागू झालेली असून, तिचा कुठेही भंग होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन कक्ष गांभीर्याने काम पाहील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (Dhule Lok Sabha Election)

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची (एमसीएमसी) स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षाच्या माध्यमातून ही समिती मुद्रित, दृक्‍श्राव्य व सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या पोस्ट/बातम्यांवर बारीक नजर ठेवत आहे.

तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे धुळे लोकसभा मतदारसंघासाठी राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण तसेच सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी मीडिया कक्षाची स्थापना केलेली आहे. सक्षम अधिकाऱ्यांसह सोबत आवश्यक तज्ज्ञ व्यक्तींची, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पूर्वपरवानगी आवश्‍यक

राजकीय पक्षास किंवा उमेदवारास आदर्श आचारसंहितेत नमूद केल्यानुसार सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जाहिरात प्रसारित करून निवडणुकीचा प्रचार करावयाचा असल्यास त्यांनी त्याआधी मीडिया कक्षातील ‘एमसीएमसी’ समितीकडून जाहिराती पूर्व-प्रमाणित (प्री-सर्टिफाय) करून घेणे आवश्यक आहे.

जाहिराती पूर्व प्रमाणित करून घेताना जाहिरातीचा मजकूर, ऑडिओ, व्हिडिओ असल्यास तो, जाहिरात देण्याचे कारण, जाहिराती निर्माण करण्यास तसेच प्रसारित करण्यास येणारा खर्च विहित नमुन्यातील अर्जासोबत जिल्हा माहिती कार्यालयातील ‘एमसीएमसी’ समितीकडे सादर करावा लागेल. या अर्जाच्या अनुषंगाने प्रमाणित झालेल्या जाहिरातीस मान्यता क्रमांक देण्यात येईल. (latest marathi news)

प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातीसोबत जाहिरातीच्या मान्यता क्रमांकाचा उल्लेख करणे आवश्यक राहील. पूर्व-प्रमाणित न केलेल्या जाहिराती प्रसारित करून प्रचारासाठी वापरल्यास सर्व संबंधितांविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते.

अर्जासाठी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, माध्यम कक्ष, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन आहे.

हालचालींवरही नजर

निवडणुकीच्या काळात प्रत्येक राजकीय हालचालींसह सायबर सेलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत सोशल मीडियाशी संबंधित सर्व प्लॅटफॉर्मवर उमेदवार, त्यांचे नातेवाईक, सोशल मीडिया इन्फ्लूएंजर तसेच पक्षांशी संबंधित खात्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

यात प्रामुख्याने समाज माध्यमांवर (फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, एक्स, व्हॉट्सॲप, टेलिग्राम आदी) वांशिक, धार्मिक किंवा जातीविषयक पोस्टद्वारे सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या, नागरिकांत निवडणूक प्रक्रियेसंदर्भात निवडणुकीत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन संभ्रम निर्माण करणाऱ्या तसेच हिंसा.

फेक मेसेज, मॉर्फ केलेले फोटो, ऑडिओ, व्हिडिओ, एसएमएस निर्माण करणे किंवा शहानिशा न करता अशा पोस्ट शेअर करणाऱ्यांवर मीडिया कक्षाची करडी नजर असून, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

...तर ग्रुप ॲडमिनवर फौजदारी कारवाई

व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या बंदिस्त मेसेजिंग ग्रुपचे व्यवस्थापन करणाऱ्या ॲडमिनने त्यांच्या सदस्यांद्वारे ग्रुपमध्ये दिल्या जाणाऱ्या माहितीसंदर्भात सावध राहावे. ग्रुपवरील एखाद्या सदस्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यास निर्माण होणाऱ्या कायदेशीर बाबींमध्ये पोस्ट टाकणाऱ्या सदस्यांसोबत ग्रुप ॲडमिनवरदेखील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

नागरिकांना आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करावयाची असल्यास त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून c-vigil ॲप डाउनलोड करून घ्यावे. या ॲपच्या माध्यमातून संबंधित तक्रारीचा फोटो/व्हिडिओ व इतर तपशील द्यावा. नागरिकांच्या तक्रारींवर निवडणूक विभागाकडून लगेच दाखल घेण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT