NCP Taluka President Girish Nerkar while welcoming Jayant Patil, State President of Nationalist Congress Party (Sharad Chandra Pawar). esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : खंडित पुरवठ्याने वीजग्राहक मेटाकुटीला; साक्री तालुक्यात वीज समस्या जटिल

Dhule News : साक्री तालुक्यात शेतशिवारात सातत्याने कमी दाबाचा वीजपुरवठा, दिवसात पस्तीस ते चाळीस वेळा वीज ट्रिप होणे, तांत्रिक बिघाड अशा अनेक वीज समस्यांनी वीजग्राहक मेटाकुटीला आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेची समस्या जटिल झाली आहे. शेतशिवारात सातत्याने कमी दाबाचा वीजपुरवठा, दिवसात पस्तीस ते चाळीस वेळा वीज ट्रिप होणे, तांत्रिक बिघाड अशा अनेक वीज समस्यांनी वीजग्राहक मेटाकुटीला आला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष घालावे. (Dhule Electricity problem in Sakri taluka complex)

अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीश नेरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हा वीज कार्यालयाजवळ आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. धुळ्यात निष्ठावान कार्यकर्ता संवाद मेळाव्यात निवेदनही देण्यात आले.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या. विजेची समस्या नित्याची झाली असून, स्थानिक पातळीवर कोणतीही उपाययोजना लवकर केली जात नाही. उन्हाळा, हिवाळा असो वा पावसाळा नेहमी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे.

दिवसा कधीही केव्हाही वीजपुरवठा खंडित केला जातो. वीज कर्मचाऱ्यांना कारण विचारले तर ‘डायरेक्टची लाईन गेली’ असे गुळगुळीत उत्तर दिले जाते. एरवी झाडाचे पान हलत नाही अशा वेळी वीजपुरवठा खंडित कसा होतो, असा प्रश्न उपस्थित केला जातो. (latest marathi news)

वीजतारा लोंबकळलेल्याच

दर वर्षी पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांचे जीर्ण व लोंबकळत असलेली तार बदलणे आवश्यक असताना त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष असते. शिवाय कंपनीतून नवीन साहित्य उपलब्ध होत नसल्याचे उत्तर दिले जाते. लोंबकळणाऱ्या तारा असल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांना अंतरमशागत वा कोणत्याही कामासाठी औत चालविणे अवघड होत असल्याचे चित्र आहे.

अशा बाबी वीज कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर दुर्लक्ष केले जात आहे. साक्री तालुक्यात आशिया खंडातील सर्वांत मोठा सौरऊर्जा व पवनऊर्जा प्रकल्पही आहे. मात्र यातील उत्पन्न होणारी हजारो मेगावॉट वीज जाते कुठे? तालुक्यातील जनतेला अजून माहिती नाही. सर्व प्रकल्पांची वीज कुठे वितरित होते याची एसआयटी चौकशी व्हावी.

अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. एवढे मोठे प्रकल्प असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा पुरेशी वीज मिळत नाही याची सखोल चौकशी करत तालुक्यातील शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यांनी दिले निवेदन

निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा सरचिटणीस नरेंद्र तोरणे, तालुकाध्यक्ष गिरीश नेरकर, सरचिटणीस संदीप भामरे, उपाध्यक्ष रवी तोरवणे, प्रदेश किसान सभेचे सयाजी ठाकरे, युवक तालुकाध्यक्ष कल्पेश सोनवणे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: 'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT