cow (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्हा बंदीच्या आदेशामुळे शेतकरी संकटात; काढणीचा खर्च निघत नसल्याने चिंतेची स्थिती

Dhule : संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हाबंदीचा आदेश दिल्याने दादर, ज्वारीचा कडबा घेण्यास कोणी तयार नाही.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हाबंदीचा आदेश दिल्याने दादर, ज्वारीचा कडबा घेण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे शेत-शिवारात कडबा तसेच विविध प्रकारचा चारा पडून आहे. काढणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्याची एकूणच हवामानाची स्थिती लक्षात घेता हा जिल्हा प्रामुख्याने रब्बीचा जिल्हा म्हणून सरकार दरबारी नोंद आहे. (Dhule Farmers in trouble due to district ban order marathi News )

जिल्ह्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन इंग्रज सरकार काळापासून हा जिल्हा रब्बीसाठी प्रसिद्ध आहे. साक्री, शिरपूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात दादर व ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. गेल्या खरीप हंगामात मान्सून (पाऊस) अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

पीक जोमदार...

रब्बी हंगामाआधी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने ज्वारी पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी झाली. ज्वारीसाठी यंदा अनुकूल हवामान असल्यामुळे पीक जोमदार आले होते. अपेक्षेप्रमाणे उत्पादनही यंदा चांगले निघाले. ज्वारीच्या काढणीनंतर जनावरांना सुका चारा म्हणून पशुपालक कडब्याची साठवणूक करतात. स्वतःसाठी राखून ठेवून उर्वरित कडबा विक्री केला जातो.

जिल्हा बंदीचा आदेश

मात्र, यंदा जिल्हा प्रशासनाने चाऱ्यासाठी जिल्हाबंदीचा आदेश लागू केल्याने कडब्याच्या खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. ज्वारी काढून पेंढी बांधण्याचा खर्च पाच ते सहा रुपये असा आहे. मात्र, सध्या कडबा घेण्यासाठी कोणीही तयार होईना, असे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील शेत-शिवारात कडबा आहे त्या जागेत पडून आहे.

सध्या अवकाळी पावसाचे वातावरण आहे. शेतातील कडबा असे अवकाळी पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चाराटंचाईबाबत पुन्हा एकदा सर्वेक्षण करून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

प्रशासनाच्या आदेशामुळे पाणी

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात किती चाराटंचाई आहे हे तपासून निर्णय घ्यावा. एकतर्फी आदेश लागू करू नये, असे वाटते. या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. खरीप हंगाम तर वाया गेलाच, रब्बीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर यंदाचे वर्ष काढण्याचा विचार करत असलेल्या शेतकऱ्यांवर जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पाणी फिरले आहे, अशी भावना या वर्गातून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT