crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fraud Crime : बनावट जातीच्या प्रमाणपत्राद्वारे ‘कोतवाल’ची मिळविली नोकरी

महसूल सज्जा असलेल्या गाव कोतवालाचे पद हे खोटे ‘भामटा राजपूत’ जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर राहुल प्रेमसिंह गिरासे याने घेतल्याची तक्रार काशीनाथ शंकर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने कोतवालपद वादात अडकले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Fraud News : दिवी (ता. शिंदखेडा) येथील महसूल सज्जा असलेल्या गाव कोतवालाचे पद हे खोटे ‘भामटा राजपूत’ जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर राहुल प्रेमसिंह गिरासे याने घेतल्याची तक्रार काशीनाथ शंकर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने कोतवालपद वादात अडकले.

तक्रार झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

बुराई नदीवरील वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्पामुळे दिवी गावाचे पुनर्वसन झाले आहे. शिंदखेडा तालुक्यात कोतवाल भरतीत काही उमेदवारांनी खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याची शंका उपस्थित करत चौकशीची मागणी श्री. पवार यांनी केली.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडेही पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. राहुल गिरासे याने राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नोंदी बदलण्यात येऊन बनावट दस्तऐवज तयार केले आहे.

तसेच खोटे जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी जात पडताळणी समितीकडे आक्षेप नोंदविला आहे. खोटे लाभार्थी विमुक्त भटक्या जातीचे लाभ घेत असून, खरे लाभार्थी आरक्षणापासून वंचित राहत असल्याचे पवार यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT