garbage can be seen in Maulviganj, Mamledar Kacheri area of ​​the city esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात स्वच्छतेची ऐशीतैशी! अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य, दुर्गंधीचा सामना

Dhule News : स्वच्छता अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियानासह स्वच्छ-सुंदर धुळे शहराचे नागरिकांना डोस पाजणाऱ्या महापालिकेकडून कचरा संकलनाच्या नावाने बोंब पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : स्वच्छता अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियानासह स्वच्छ-सुंदर धुळे शहराचे नागरिकांना डोस पाजणाऱ्या महापालिकेकडून कचरा संकलनाच्या नावाने बोंब पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. जे नागरिक, विक्रेते, व्यापारी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून मोकळे होतात, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात महापालिका कमी पडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहराचा कचरा झाल्याचे चित्र काही भागात पाहायला मिळते. (Dhule garbage collection is not done regularly by municipal corporation)

सण-उत्सवांच्या काळात स्वच्छता ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांकडून खालच्या यंत्रणेला देण्यात आले आहेत. आता हे सण-उत्सव काही दिवसांवर आलेले असताना मात्र काही भागात अक्षरशः कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते. महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळील खाऊगल्ली, मौलवीगंज परिसर,

मामलेदार कचेरी आदी भागात तर कचऱ्यासह दुर्गंधीचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी तर भररस्त्यावरील कचरा जाळण्याचा प्रकारही होत आहे. महापालिकेच्या यंत्रणेचे मात्र याकडे लक्ष नसल्याचे दिसते. कचरा संकलनावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही परिस्थिती सुधारत नसेल तर उपयोग काय, असा प्रश्‍न यातून निर्माण होतो. (latest marathi news)

काही भागात त्या-त्या भागातील स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेबाबत तुलनेने चांगले काम असल्याचे कुणीही नाकारत नाही. मात्र, सर्वत्र अशी स्थिती दिसत नाही. विशेषतः शहराच्या मुख्य भागात, वर्दळीच्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य संपूर्ण शहराचा कचरा करतात हेही नाकारता येत नाही.

अधिकाऱ्यांना समस्या दिसत नाही असे नाही पण तक्रारी झाल्याशिवाय, आंदोलने झाल्याशिवाय कार्यवाही होत नाही हेही तेवढेच खरे. यातून संपूर्ण स्वच्छता अभियानावर पाणी फिरत असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT