Baliraja (file photo)
Baliraja (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बैलांअभावी बळीराजाच्या गोठ्याचे वैभव उतरतीला; शेतकरी पारंपरिकतेऐवजी तंत्रशुद्ध शेतीकडे वळल्याचा परिणाम

दगाजी देवरे : सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : अलीकडे बहुतांश शेतकरी पारंपरिकऐवजी तंत्रशुद्ध पद्धतीने शेतीकडे वळले आहेत. पारंपरिक अवजारेही मागे पडत चालली आहेत. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच ट्रॅक्टरचा वापर करू लागल्यामुळे ग्रामीण भागात गावागावांत बैलांची संख्याही कमी होत चालली आहे. चारा समस्या व बैलांच्या गगनाला भिडलेल्या किमती यामुळे बैलांची संख्या झपाट्याने घटली आहे. (Dhule glory of Baliraja cattle farm was started to wane)

परिणामी बैलाअभाली बळीराजाच्या गोठ्याचे वैभव ओसरू लागले आहे. पूर्वापार शेतीसाठी बैलजोडीचा वापर केला जात आहे किंबहुना बैलजोडीशिवाय शेती नाही. अलीकडे शेतीला आधुनिकतेची जोड दिली जात असल्याने शेती उत्पन्न वाढू लागले आहे. परिणामी शेतकरी यांत्रिकीकरणावर भर देऊ लागला आहे.

यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक अवजारे व शेतकऱ्यांचे धन असलेली बैलांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात वैभव समजून दावणीला बांधलेली राहायची. आज ते चित्र दुर्मिळ होत चालले आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस

ग्रामीण अर्थव्यवस्था आजही कृषी व्यवसायावर आधारित आहे. त्यामुळे पूर्वापार शेतकऱ्यांच्या गोठ्यात दुभत्या जनावरांसह एक-दोन बैलजोडी हमखास आढळत असत. जमीन नांगरणी, कोळपणी, पेरणीपासून बैलगाडी ओढण्यापर्यंत प्रत्येक प्रकारच्या कामासाठी बैल उपयोगी पडतो. त्यामुळे बैलांच्या कष्टावर शेतकऱ्यांचे अर्थकारण चालते. (latest marathi news)

पूर्वी बैल शेतकऱ्यांच्या गोठ्याचे वैभव होते. बैलांच्या किमतीही आवाक्यात होत्या. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या दावणीला चार ते सहा बैल हमखास असत. बैलामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यालाही किंमत होती. मात्र दुष्काळी स्थिती, चाराटंचाईमुळेही काळाच्या ओघात बळीराजाच्या गोठ्याचे वैभव हळूहळू लोप पावत चालले आहे.

यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे शेतात बैलांचा वापर कमी झाला आहे. बैलजोडीची किंमत लाखावर गेली आहे. त्यामुळे अल्प व मध्यम उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना बैल पाळणे अशक्य झाले आहे. शेतीची बहुतांश कामे ट्रॅक्टर व इतर यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. परिणामी बैलांची मेहनत वापरून करायची कामे कमी झाली आहेत.

वाढत्या लोकसंख्येमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गरिब शेतकरी दुग्धव्यवसायासह अन्य व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैलाऐवजी गायी, म्हशींची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक गावात बैलांची संख्या कमालीची घटली आहे. पूर्वी गोठ्यातील बैलांच्या संख्येवरून त्यांची समृद्धी मोजली जात होती. मात्र बदलत्या युगात बळीराजाच्या गोठ्याचे वैभव हळूहळू उतरतीला लागले आहे.

भाजीपाला, फळशेतीला प्राध्यान्य

अलीकडे कमी वेळेत संकरित भाजीपाला व फळपिके अधिक उत्पन्न देत असल्याने पारंपरिक शेती मागे पडली आहे. अवघ्या दीड ते दोन महिन्यांत भाजीपाला पिके तयार होत असल्याने तृणधान्य, कडधान्याची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. शिवाय वाढत्या मजुरीमुळे तसली पिके परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात.

कोरडवाहू शेतकरीदेखील नांगरणीसारखी कामे यंत्राने करत असल्याने बैलजोडीचा वापर कमी झाला आहे; परंतु शेतात बैलांचा वापर घटल्याने शेतीव्यवसाय बेभरवशाचा झाल्याची माहिती जाणकार शेतकरी देताना दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT