Before the monsoon, the ongoing work of cleaning the drains in the city by the Dhule Municipal Corporation. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : यंदा शंभर टक्के नालेसफाईचे लक्ष्य! धुळे महापालिकेकडून काम सुरू

Dhule Municipality : पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईच्या कामाला धुळे महापालिकेकडून सुरवात करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे काम सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईच्या कामाला धुळे महापालिकेकडून सुरवात करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे काम सुरू आहे. मागील वर्षी साधारण ७५ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण करण्यात आले होते. या वर्षी १०० टक्के नालेसफाई होईल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (goal of hundred percent drainage clean)

त्यामुळे नालेसफाईअभावी पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार होणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. शहरातील नालेसफाईचा प्रश्‍न दर वर्षी असतो. वर्षभर याबाबत कुठेना कुठे तक्रारी असतात. त्यातही पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे महापालिकेकडून दर वर्षी हे काम केले जाते.

सप्टेंबर-२०२२ मध्ये झालेल्या पावसाने शहरातील पांझरा नदीकाठावरील वसाहतींसह इतर विविध कॉलनी भागातही पाणी शिरले होते. त्या वेळी नालेसफाईचा मुद्दा गाजला होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेकडून नालेसफाई व्यवस्थितरीत्या झाली नसल्याने शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याचा ठपका ठेवला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढवून तत्कालीन आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना आरोप-प्रत्यारोपांना सामोरे जावे लागले होते.

त्यानंतर मात्र प्रशासनाने शहरातील नालेकाठांवरील अतिक्रमणांमुळे नाले तुंबण्याचे प्रकार होतात, असे म्हणत मागील वर्षी नालाकाठावरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली होती. या अतिक्रमणांची आज काय स्थिती आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन व पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण व्हावे यादृष्टीने या वर्षी महापालिका यंत्रणेकडून नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. (latest marathi news)

पाच दिवसांपासून काम

गेल्या पाच दिवसांपासून शहरातील नालेसफाईच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. दोन जेसीबी, एक पोकलेन मशिनद्वारे हे काम सुरू आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील सुशीनाला तसेच प्रभाग १४ मध्ये नालेसफाईचे काम सुरू आहे. साधारण अर्धा किलोमीटर नालेसफाई झाल्याचे स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

मागील वर्षी साधारण ७५ टक्के नालेसफाई झाली होती. या वर्षी शंभर टक्के नालेसफाई करण्याचा प्रयत्न असल्याचेही श्री. पाटील म्हणाले. शहरातील सुशीनाला, मध्यवर्ती नाला, हमाल-मापाडी परिसर, चिरंतन हॉस्पिटल परिसर, मोतीनाला, भीमनगर परिसर, विद्यावर्धिनी महाविद्यालय परिसर, मोहाडी आदी विविध भागांतील मुख्य नाल्यांची साफसफाई महत्त्वाची आहे.

पंचवीस लाखांची तरतूद

नालेसफाईच्या कामासाठी महापालिकेकडून अंदाजपत्रकात २५ लाखांची तरतूद आहे. या खर्चातून हे काम करण्यात येणार आहे. मागील वर्षीदेखील २५ लाख खर्चातूनच नालेसफाईचे काम करण्यात आले होते.

मशिनरीचे भाडे असे

जेसीबी...११०० रुपये प्रतितास

पोकलेन...२५०० रुपये प्रतितास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT