Gold Rate esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Gold Rate : जिल्ह्यात सोन्याचे दर प्रथमच 73 हजार पार; चांदीही 85 हजारांपर्यंत

Dhule News : सोने बाजाराच्या ट्रेंडमध्ये बुधवारी (ता. १७) बदल पाहायला मिळाला. २४ कॅरेट सोन्याचा दर एक हजार १०० रुपयांनी वाढून प्रथमच ७३ हजार १०० रुपयांवर पोचला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सोने बाजाराच्या ट्रेंडमध्ये बुधवारी (ता. १७) बदल पाहायला मिळाला. २४ कॅरेट सोन्याचा दर एक हजार १०० रुपयांनी वाढून प्रथमच ७३ हजार १०० रुपयांवर पोचला. आता २२ कॅरेट सोनेदेखील महाग होऊन प्रति १० ग्रॅम ६७ हजार ५० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचले. चांदीने आतापर्यंतची उच्चांकी गाठली आहे. आठवडाभरात सुमारे तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे. (Dhule Gold rate in district for first time 73 thousand per Silver also up to 85 thousand)

गेल्या वर्षभरात सोने व चांदीच्या दरामध्ये कमालीची तेजी आली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात २४ कॅरेट सोने जीएसटी अतिरिक्त १२ हजार ७८४ रुपये (२१.१७ टक्के) आणि २२ कॅरेट सोन्याचे दर ११ हजार ७१० रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. १० एप्रिलला २४ कॅरेट सोने ७२ हजार ३०० रुपये आणि २२ कॅरेट सोने ६६ हजार २७० रुपये प्रतिदहा ग्रॅम होते.

चांदीचा दरही प्रथमच ८५ हजारांच्या जवळ पोचला आहे. बुधवारी चांदीचा दर दोन हजार रुपयांनी वाढून ८५ हजार रुपये प्रतिकिलो या विक्रमी पातळीपर्यंत पोचला. यापूर्वी १२ एप्रिलला ८४ हजार ५०० रुपयांची विक्रमी दरवाढ झाली.

विक्रीचा ओघ वाढला

आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीचा ओघ वाढल्याने उच्चांकी पातळीवर गेलेल्या सोन्याचे दर खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, महागाईत वाढ झाल्याचे समोर आल्याने अचानक सोन्याने उसळी घेत दरात एक हजार १०० रुपयांची वाढ होत स्थानिक सराफात सोन्याने विक्रमी ७३ हजार १०० (जीएसटी अतिरिक्त) असा विक्रम केला. (latest marathi news)

गेल्या बुधवारी सोन्याचे प्रतितोळ्याचे दर ७२ हजार ३०० रुपये होते. ते गुढीपाडव्याला ७२ हजार रुपयांवर स्थिर राहिले. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात तोळ्यामागे ४०० रुपयांनी, तर चांदीच्या दरात किलोमागे दीड हजार रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे.

स्थानिक सोने-चांदी भाव

(प्रतिग्रॅम, जीएसटी अतिरिक्त)

तारीख....२४ कॅरेट....२२ कॅरेट....चांदी

* १७ एप्रिल....७३,१००....६७,०५०....८५,०००

* १६ एप्रिल....७२,०००....६६,९८०....८३,५००

* १५ एप्रिल....७२,७००....६६,९७०....८४,०००

* १४ एप्रिल....७२,७००....६६,६४०....८३,५००

* १३ एप्रिल....७२,७००....६६,६४०....८३,५००

* १२ एप्रिल....७३,५००....६७,३८०....८४,५००

* ११ एप्रिल....७२,०००....६५,९५०....८३,०००

* १० एप्रिल....७२,३००....६६,२७०....८३,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT