Municipal Officers hearing objections received under the Revised Taxation Procedure of Properties in the Municipal Hall. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 2 दिवसांत 739 हरकतींवर सुनावणी; मालमत्तांना सुधारित कर आकारणीची प्रक्रिया

Dhule : शहरातील मालमत्तांना सुधारित कर आकारणीच्या प्रक्रियेंतर्गत शहरातील चाळीसगाव रोड व पेठ भागातील मालमत्ताधारकांकडून प्राप्त सुनावणींवर महापालिकेत १ जूलैपासून सुनावणी सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील मालमत्तांना सुधारित कर आकारणीच्या प्रक्रियेंतर्गत शहरातील चाळीसगाव रोड व पेठ भागातील मालमत्ताधारकांकडून प्राप्त सुनावणींवर महापालिकेत १ जूलैपासून सुनावणी सुरू झाली. गेल्या दोन दिवसांत ७३९ हरकतदार सुनावणीला हजर राहिले, २६१ हरकतदारांनी सुनावणीला दांडी मारली. धुळे महापालिकेतर्फे महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांना करयोग्य मूल्यनिश्‍चितीची (सुधारित कर आकारणी) प्रक्रिया सुरू आहे. प्रारंभी हद्दवाढ क्षेत्रात ही प्रक्रिया पूर्ण झाली. ( Hearing on 739 objections in 2 days Procedure for revised taxation of properties)

त्यानंतर देवपूर व साक्री रोड भागासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. पेठ भाग व चाळीसगाव रोड भागाची प्रक्रिया बाकी होती. मध्यंतरीच्या काळात लोकसभा निवडणुकीमुळे या प्रक्रियेला ब्रेक लागला. दरम्यान, १ जुलैपासून या दोन्ही भागांतील प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. अर्थात या भागातून प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यात येत आहे. पेठ भाग व चाळीसगाव रोड या दोन्ही भागांत एकूण ३९ हजार ४०० मालमत्ताधारक आहेत. यातील २६ हजार ७० मालमत्ताधारकांना सुधारित कर आकारणीच्या नोटिसा देण्यात आल्या. (latest marathi news)

या नोटिसांवर हरकती मागविण्यात आल्या. मुदतीअंती एकूण पाच हजार १४७ हरकती प्राप्त झाल्या. या हरकतींवर १ जुलैपासून महापालिकेत सुनावणी सुरू झाली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त संगीता नांदूरकर, उपायुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त हेमंत निकम, सहाय्यक आयुक्त समीर शेख, वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे आदी सुनावणी घेत आहेत.

७३९ हरकतदार हजर

रोज ५०० हरकतदारांना सुनावणीसाठी बोलविण्यात येत आहे. १ जुलैला ३७७ व २ जुलैला ३६२ असे एकूण ७३९ हरकतदार सुनावणीसाठी हजर राहिले. २६१ हरकतदारांनी मात्र सुनावणीला दांडी मारली. दरम्यान, ज्या हरकतींवर सुनावणी झाली, त्यातील ११८ हरकतींच्या अनुषंगाने स्पॉट व्हेरिफिकेशनचा निर्णय घेण्यात आला. स्पॉट व्हेरिफिकेशननंतर संबंधितांच्या तक्रारींवर योग्य निर्णय होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra local politics news : सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांची गावरान भाषेत खिल्ली उडवली, जिल्हा परिषद राजकारण तापलं

Bharat Taxi : ओला-उबरला पर्याय आला! स्वस्त दरात सुरक्षित प्रवास देणारे ‘भारत टॅक्सी’ अ‍ॅप आज होणार लाँच; जाणून घ्या सर्व माहिती

Latest Marathi News Live Update : गुजरात उच्च न्यायालयाने आसाराम बापूची ४५,००० चौरस मीटर जमीन परत मिळविण्यासाठी राज्य सरकारच्या कारवाईला मान्यता दिली

Rose Day Dessert Recipes : व्हॅलेंटाईन वीकची गोड सुरुवात! Rose Day ला गुलाबाचे 3 भन्नाट डेजर्ट ट्राय करा

Jaykumar Gore:औंधसह २१ गावांना तीन वर्षांत पाणी देणार: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; यापुढची निवडणूक पाणीप्रश्नावर होणार नाही!

SCROLL FOR NEXT