Divisional Superintendent Agriculture Officer, District Superintendent Agriculture Officer, Taluka level officers and staff of Agriculture Department while enjoying paddy harvest while getting down in paddy khachar in Shivara. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : फळ, भाजीपाला पिकांकडे वळलात तरच उत्पन्नात वृद्धी; पश्चिम पट्ट्यात कृषी विभागाचे चर्चासत्र

Dhule : फळ, भाजीपाला पिकांकडे वळलात तरच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वृद्धी होईल, असे मत चिकसे येथील चर्चासत्रात विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बदलत्या हवामानानुसार पीकपद्धती बदलून पारंपरिक पिकांऐवजी फळ, भाजीपाला पिकांकडे वळलात तरच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वृद्धी होईल, असे मत चिकसे येथील चर्चासत्रात विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध फळबाग लागवडीच्या योजनांमध्ये सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी आवाहन केले. विविध पिकांचे क्षेत्र वाढविण्याच्या सूचना कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. (Increase in income fruit vegetable crops Seminar of Agriculture Department )

शासनाच्या कृषी विभागातर्फे साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम बुधवारी (ता. २४) झाला. विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ, नवनाथ कोळपकर (प्रकल्प संचालक आत्मा), दिनेश नांद्रे (प्रकल्प समन्वयक कृषी विज्ञान केंद्र, धुळे) आदींनी सहभाग घेतला. प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रात चिकसे (ता. साक्री) येथील दादाजी खैरनार यांची शेडनेटमधील भाजीपाला लागवड, धेड्या मन्या राऊत (वार्सा) यांची चारसूत्री भातलागवड, तद्वतच बारीपाडा येथील वनसंवर्धन केंद्र, मियावाकी पद्धतीची वृक्षलागवड अशा विविध प्रक्षेत्रांना भेटी देण्यात आल्या.

ड्रोन टेक्नॉलॉजी वापरा

कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक दिनेश नांद्रे यांनी केळी पीक लागवडीविषयी मार्गदर्शन केले. कीटक शास्त्रज्ञ पंकज पाटील यांनी पारंपरिक शेतीपद्धती काढून आधुनिक शेतीपद्धतीकडे वळत शेती पिकामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. (latest marathi news)

उपविभागीय कृषी अधिकारी बापूसाहेब गावित, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी विनय बोरसे, कृषी विज्ञान केंद्रचे कीटक शास्त्रज्ञ पंकज पाटील, साक्रीचे तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे, शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तव, धुळे तालुका कृषी अधिकारी वाल्मीक प्रकाश, शिरपूर येथील तालुका कृषी अधिकारी संजय पवार, सर्व तालुक्यांतील मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. पिंपळनेर मंडळ कृषी अधिकारी तानाजी सदगीर यांनी सूत्रसंचालन केले.

भातलागवडीचा घेतला आनंद

हितेंद्र सोनवणे यांनी ‘आत्मा’तर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, चर्चासत्रे व अभ्यास दौरे यांची माहिती दिली. चिकसेत कार्यक्रम व प्रक्षेत्र भेटीनंतर कृषी विभागाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी वार्सा येथे भात खाचरामध्ये उतरून भातलागवड करत लागवडीचा आनंद घेतला. बारीपाडा येथील प्रक्षेत्र भेट व चर्चासत्रात वनभूषण चैत्राम पवार यांच्यासमवेत अधिकाऱ्यांनी सेंद्रिय शेती व सेंद्रिय शेतमालाचे मूल्यवर्धन करत मार्केटिंग व ब्रॅन्डिंग कशी करता येईल याविषयी चर्चा केली. मळगाव प्र. वार्सा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT