Villagers showing unauthorized construction. In the second photograph, the official giving a statement to the village servants. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वकवाड येथील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर; चर्चपाठोपाठ प्रधान भवनाची जागा हडपण्याचा प्रयत्न

Dhule News : वकवाड (ता. शिरपूर) येथे एकही ख्रिश्चनधर्मीय व्यक्ती नसताना अनधिकृतरीत्या चर्चचे बांधकाम करण्यात आले. पाठोपाठ चर्चला लागून प्रधान भवनासाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : वकवाड (ता. शिरपूर) येथे एकही ख्रिश्चनधर्मीय व्यक्ती नसताना अनधिकृतरीत्या चर्चचे बांधकाम करण्यात आले. पाठोपाठ चर्चला लागून प्रधान भवनासाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून चर्चसह अनधिकृत बांधकाम काढण्यात यावे किंवा त्याचा वापर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी करावा, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली. (Dhule Issue of unauthorized construction at Wakwad)

पदाधिकारी व ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला नुकतेच मागणीचे निवेदन दिले. त्यानुसार वकवाड पूर्णत: आदिवासी गाव असून, गावात कोणीच ख्रिश्चन व्यक्ती नसतानाही तेथे एका व्यक्तीने अनधिकृतरीत्या चर्चचे बांधकाम केले आहे. त्यानंतर चर्चलगत असलेल्या व प्रधान भवनासाठी चौथरा बांधून राखीव ठेवलेल्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले.

त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. संबंधित चर्च आणि बेकायदा बांधकाम तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी उपसरपंच खजान पावरा, सीताराम पावरा, मदन पावरा, सीताराम लकड्या पावरा, ग्रामपंचायत सदस्य रुमा पावरा, लक्ष्मण पावरा, भारला पावरा, साहेबराव पावरा, भाऊ पावरा, निखासीबाई पावरा. (latest marathi news)

हिरालाल पावरा, मगन पावरा, दिलदार पावरा, विजय पावरा, गोविंद पावरा, गणेश पावरा, शांताबाई पावरा, संतोष पावरा, किरण पावरा, विशाल पावरा, खेनसिंग पावरा, दिनेश पावरा, तुषार पावरा, सागर पावरा, मिलिंद पावरा, आकाश पावरा यांनी केली.

अंगणवाडीची जागा हडपली

ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत विविध कार्यक्रम व सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी प्रधान भवन उभारण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला होता. त्यासाठी गाव नमुना नंबर आठद्वारे सुमारे १५ हजार चौरसफूट जागा प्रधान भवनासाठी राखीव ठेवण्यात आली. त्याच जागेवर एका व्यक्तीने अनधिकृत चर्च उभारले आहे.

पाठोपाठ प्रधान भवनाच्या मालकीच्या जागेत अंगणवाडीची इमारत बांधताना चौथऱ्यापर्यंत काम पूर्ण झाले असताना ते बंद पाडून स्वत:च्या ताब्यातील अनधिकृत बांधकाम करून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT