Temperature esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Summer Heat : उष्णतेच्या लाटेच्या झळा प्रचारालाही; जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून उपाययोजना

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या काळात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांनी मतदारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखायला सुरवात केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या काळात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांनी मतदारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखायला सुरवात केली आहे. सरकारनेही राजकीय पक्षांचा प्रचार करणाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसे नियोजन करण्याचीही सूचना केली आहेत. (Dhule Lok Sabha Constituency heat wave is intense during general elections)

हवामान खात्याने यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल आणि मे या कालावधीत दीर्घकाळ उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे. याच कालावधीत विविध टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यात प्रत्येक टप्पानिहाय उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यापासून ते प्रचारफेऱ्या, जाहीर सभांचे नियोजन राजकीय पक्षांनी केले आहे. त्यात उन्हाचा कडाका लक्षात घेऊन नियोजनामध्ये बदलही केला जात आहे. उमेदवारांना आपल्या समर्थकांची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

विविध उपाययोजना

लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना केंद्रीय निवडणूक आयोगानेही सर्व राज्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मतदानासाठी संभाव्य उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. (latest marathi news)

अर्थात, यामध्ये राजकीय पक्षांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश नव्हता. हवामान खात्याने एप्रिल ते मे या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक ऊन जाणवू शकते, असा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेचा कालावधी दोन ते चार दिवसांऐवजी थेट १० ते २० दिवसांपर्यंत राहू शकतो.

उष्णतेच्या लाटेपासून मतदार आणि कर्मचाऱ्यांचा बचाव व्हावा म्हणून सरकारने काही सूचना केल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांवर किमान सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. मतदारांच्या रांगांच्या व्यवस्थापनासाठी एनसीसी.

एनएसएस आणि स्काउट गाइडच्या स्वयंसेवकांची मदत घ्यावी, सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, पुरेशी आसनव्यवस्था ठेवली जावी तसेच वीजही उपलब्ध करून द्यावी, असे सूचनेत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT