During the campaign of the BJP grand alliance, the candidate Dr. Subhash Bhamre, Jayakumar Rawal and activists. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election: मतदारसंघात रोजगारनिर्मितीला प्राधान्य : उमेदवार डॉ. भामरे; शिंदखेड्यात विकास कामांचा घेतला परामर्श

Dhule News : विकासाचे पुरक प्रकल्प अंमलबजावणीत आणून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी झोकून काम करेल, अशी भूमिका भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी मांडली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी औद्योगिकीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर विकासाचे पुरक प्रकल्प अंमलबजावणीत आणून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी झोकून काम करेल, अशी भूमिका भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी मांडली. (Dhule Lok Sabha Election 2024 Candidate Dr bhamare news)

धुळे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय गावांमध्ये प्रचार रॅली, कॉर्नर सभा, जाहीर सभा झाली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन होण्यासाठी उमेदवार डॉ. भामरे यांना मताधिक्याने हॅट्रीकसह संसदेत पाठविण्याचे आवाहन मान्यवरांकडून झाले.

माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, डॉ. भामरे, सहकारमहर्षी सरकारसाहेब रावल, लोकसभा समन्वयक नारायण पाटील, जिल्हा परिषदचे माजी सभापती कामराज निकम, प्रा. डी. एस. गिरासे, प्रवीण महाजन, डी. आर. बोरसे, दीपक बागल, जिजाबराव पाटील, आदींसह त्या- त्या गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार रावल म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांनी मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी दहा वर्षांत विविध धाडसी निर्णय घेतले. ते अमलात आमले. पायाभूत सुविधांचे बळकट जाळे निर्माण केले. जागतिक स्तरावर देशाची वेगळी ओळख निर्माण केली. २०१४ पूर्वी अकराव्या क्रमांकावर असलेली आर्थिक स्थिती सुधारून पाचव्या क्रमांकाव आणली. काही देशविघातक शक्तींना मोदी नकोत. त्यामुळे देशवासीयांची विविध मुद्यांवरून दिशाभूल केली जात आहे. भूलथापांनना बळी न पडता मतदारांनी पुन्हा भाजप-महायुती उमेदवाराच्या पाठीशी राहावे. (latest marathi news)

विकास कामांना प्राधान्य

उमेदवार डॉ. भामरे म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात धुळे लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न, प्रकल्प मार्गी लावण्यास प्राधान्य दिले. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना शेतकरी हितासाठी मार्गी लावली. त्यात ८० टक्के काम पूर्णत्वास आले असून अंतिम कामानंतर धुळे, शिंदखेडा तालुक्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल.

येत्या दीड वर्षात ही गावे सुजलाम-सुफलाम होतील. धुळे- नरडाणा रेल्वेमार्गाचे काम आचारसंहितेनंतर सुरू होणार आहे. मतदारसंघात सात राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात यश आले. तसेच आगामी काळात धुळे मतदारसंघात या पायाभूत सुविधांमुळे औद्योगीकरणाला वेग येणार असून, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉच्या दुसऱ्या टप्प्यात धुळे जिल्ह्याचा समावेश झाल्याने अन्नप्रक्रिया, इथेनॉल तसेच टेक्स्टाइल पार्कही सुरू होणार आहेत.

त्यामुळे रोजगारनिर्मिती होईल. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा खासदारकीची संधी द्यावी, असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले. नारायण पाटील, कामराज निकम आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी मोदी व डॉ. भामरे यांच्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामांचा लेखाजोख मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT