Lok Sabha Election 2024  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : शिंदखेडा मतदारसंघात मतदान 338 केंद्रे; 169 केंद्रांवर कॅमेऱ्याची नजर

Lok Sabha Election : धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी २० मेस होणाऱ्या मतदानाची शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी २० मेस होणाऱ्या मतदानाची शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात ३३८ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, यांपैकी १६९ केंद्रांवर कॅमेरे बसविण्यात आले असून, ही केंद्रे शिंदखेडा, जिल्हा आणि मुख्य निवडणूक आयोग कार्यालयाशी जोडण्यात आली आहेत. (338 polling stations in Sindkheda Constituency )

प्रत्येक केंद्रावर सहा अशी एकूण दोन हजार २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३३८ पैकी चार मतदान केंद्रे संवेदनशील असून, एक केंद्र सखी केंद्र म्हणून तयार करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे यांनी दिली.

२,०२८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ३३८ मतदान केंद्रांवर दोन हजार २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पाच कर्मचारी मतदान प्रक्रियेशी संबंधित, तर एक पोलिस कर्मचारी आहे‌. या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत व मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तहसील कार्यालयात परत आणण्यासाठी १२६ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४१ बसचा समावेश आहे.

२९ क्षेत्रीय अधिकारी

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक प्रक्रिया कुठलीही अडचण न येता पार पाडण्यासाठी २९ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे क्षेत्रीय अधिकारी आपल्या अधिकारातील मतदान केंद्रांना भेटी देऊन त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे किंवा नाही याची पाहणी करतील तसेच काही अडचण आल्यास ती दूर करण्यासाठी मदत करणार आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान युनिट, एक नियंत्रण युनिट, एक व्हीव्हीपॅट मशिन देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मशिन हाताळताना कुठलीही अडचण आल्यास मतदान केंद्राध्यक्षांनी आपल्या केंद्राशी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, अशा सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जमदाडे यांनी दिल्या आहेत.

चार मतदान केंद्रे संवेदनशील

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात तीन लाख ३१ हजार ८४५ मतदार असून, त्यात एक लाख ६९ हजार ६४८ पुरुष, तर एक लाख ६२ हजार १९६ स्त्री मतदार आहेत. एक किन्नर मतदाराचा समावेश आहे. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ३३८ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी व एक पोलिस असे एकूण सहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात दोंडाईचा शहरातील दोन, चिमठाणा एक, वणी येथील एक मतदान केंद्र संवेदनशील असून, या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे यांनी दिली. शिंदखेडा शहरात एक सखी मतदान केंद्र शहरातील उज्ज्वल प्राथमिक शाळेत तयार करण्यात आले आहे.

१६९ केंद्रांवर कॅमेऱ्याची नजर

मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ५० टक्के मतदान केंद्रांवर कॅमेरे बसवण्यात आले असून, ही केंद्रे शिंदखेडा जिल्हा आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयांशी जोडण्यात आली आहेत. या केंद्रावर होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर मुख्य निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहे.

कर्मचाऱ्यांचे केंद्रावरच मतदान

टपाली मतदानाऐवजी ४४७ मतदान कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्यात आले असून, या प्रमाणपत्रानुसार या मतदार कर्मचाऱ्यांची ज्या केंद्रावर नियुक्ती झाली आहे त्या केंद्रावरच त्यांना मतदान करता येणार आहे. (latest marathi news)

१०८ वयोवृद्ध मतदारांचे मतदान

मुख्य निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर न जाता घरी राहूनच मतदान करता येईल अशी व्यवस्था केली आहे. त्यानुसार शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात १२४ मतदारांनी यासंबंधीचा अर्ज भरून दिला होता. त्यांपैकी १०८ मतदारांनी घरी राहून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

लोकशाही बळकट करा

लोकसभेच्या मतदानासाठी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात वोटर स्लिप वाटण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल नेऊ नये. धुळे लोकसभा मतदारसंघात ८० टक्क्यांच्या वर मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगातर्फे प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदारांनीदेखील मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळ व संभाजी पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT