Collector Abhinav Goyal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : उमेदवारी अर्जांची आजपासून स्वीकृती : अभिनव गोयल

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी शुक्रवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. ती सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून ३ मेपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत चालेल.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी शुक्रवार (ता. २६)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. ती सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून ३ मेपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत चालेल. धुळे लोकसभा मतदारसंघातील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. (Jalgaon Lok Sabha Election Acceptance of nomination forms from today)

अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते. जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की ४ मेस उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ६ मेस दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. एकापेक्षा जास्त उमेदवार राहिल्यास २० मेस मतदान होईल. ४ जूनला मतमोजणी होईल.

उमेदवारांना सूचना

निवडणुकीत उमेदवारांना खर्चमर्यादा ९५ लाख रुपये आहे. सोशल मीडियावर जिल्हा व पोलिस प्रशासनाचे लक्ष आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांना विहित नमुना २ ‘ए’मध्ये सादर करावयाचा आहे. उमेदवाराचे शपथपत्र नमुना २६, मतपत्रिकेवरील फोटोबाबतचे घोषणापत्र.

मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबतचे उमेदवाराचे लेखी पत्र, नामनिर्देशनपत्रासोबत सर्वसाधारण उमेदवारास २५ हजार रुपये अनामत रक्कम, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी १२ हजार ५०० रुपये राहील. एक उमेदवार जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे सादर करू शकेल, तसेच एक उमेदवार दोनपेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज करू शकणार नाही. (latest marathi news)

दहा सूचक आवश्‍यक

उमेदवारास राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक, तर अपक्ष असल्यास एकूण दहा सूचक आवश्यक राहतील. राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहित सूचनापत्र नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी तीनपूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करणे आवश्यक राहील.

नामनिर्देशपत्रासोबत सादर करावयाचे विहित शपथपत्र नमुना २६ मधील सर्व रकाने भरणे आवश्यक असेल. एखादी बाब लागू नसेल तर निरंक/लागू नाही, असा तपशील नोंदविणे आवश्यक आहे.

गोयल यांचा इशारा

उमेदवारांनी साधारणत: तीन महिन्यांआतील कालावधीत काढलेला फोटो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामनिर्देशनपत्रासोबत किंवा जास्तीत जास्त छाननीच्या वेळेपूर्वी द्यावयाचा आहे. फोटोचा आकार २ सेमी X २.५ सेमी असावा. घोषणापत्र नामनिर्देशनपत्रासोबत देण्यात येईल.

उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक राहील. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून सी-व्हीजिल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. आचारसंहितेचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले, तर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही श्री. गोयल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT