Ration Shop Bag esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Code of Conduct : आचारसंहिता लागू झाल्याने पिशव्यांचा बाजार गुंडाळला

Dhule Lok Sabha Code of Conduct : रेशन दुकानावर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाचे खाद्यपदार्थ घरी नेण्यासाठी राज्य शासनाने पुरविलेल्या पिशव्या १६ मार्चपासून दुकानदारांनी गुंडाळून ठेवल्या.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Code of Conduct : रेशन दुकानावर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाचे खाद्यपदार्थ घरी नेण्यासाठी राज्य शासनाने पुरविलेल्या पिशव्या १६ मार्चपासून दुकानदारांनी गुंडाळून ठेवल्या. त्यामुळे आता लाभार्थ्यांना लाभाच्या वस्तू नेण्यासाठी घरूनच थैली न्यावी लागणार आहे. यात जिल्ह्यातील तीन लाख लाभार्थ्यांना ही सोय करावी लागेल. (Dhule Lok Sabha Election Stopping bags at ration shop due to implementation of code of conduct)

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची काटेकोरपणे पालन होईल या दृष्टीने जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना सतर्क केले होते. १६ मार्चला आचारसंहिता जाहीर होताच राज्य शासनाने लाभार्थ्यांसाठी पुरविलेल्या पिशव्या गुंडाळून ठेवाव्या लागल्या आहेत. राज्य शासनाने पुरविलेल्या या पिशव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छयाचित्रे आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला दहा किलो वजनक्षमतेची एक ‘डी कट लॅमिनेटेड’ पिशवी वितरित केली जात होती. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना या पिशव्या जिल्हाभरात वितरित केल्या जाणार होत्या. (latest marathi news)

ई-पास प्रणालीद्वारे युद्धपातळीवर शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशीही या पिशव्यांचे वितरण करण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते. दरम्यान, ‘आनंदाचा शिंधा’च्या मथळ्याखाली वाटप करण्यात आलेल्या पिशव्यांमुळे आचारसंहिता भंग होऊ शकते, यादृष्टीने प्रशासनाने काळजी घेतली आहे.

जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे ७५ हजार ६५७ तसेच प्राधान्य योजनेचे दोन लाख ३७, असे एकूण तीन लाख १२ हजार ६५७ लाभार्थी आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडे सध्या तीन लाख सहा हजार ९६० पिशव्या प्राप्त झाल्या. तशातच लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने आता पिशव्यांचा बाजार गुंडाळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: सीएसडीएसचे संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT