dhule
dhule 
उत्तर महाराष्ट्र

धुळे "बंद'ला हिंसक वळण: हवेत गोळीबार

सकाळ वृत्तसेवा

निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या "बंद'ला जिल्ह्यातील शिरपूर व धुळे शहरात हिंसक वळण लागले. दगडफेक, जाळपोळ, नासधूस असे प्रकार करणाऱ्या जमावाने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यासमोर बंदोबस्तासाठी असलेले अधिकारी, कर्मचारी "टार्गेट' केले. त्यात पोलिस उपअधीक्षकासह 12 कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांसह

"एसआरपी'च्या जवानांनी हवेत गोळीबार केला.
जिल्ह्यात "बंद'चा फारसा परिणाम जाणवणार नाही, असे वातावरण असताना शिरपूर येथे सकाळी पावणेदहाला एसटीवर दगडफेक झाली. त्यात दोन प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी एकनंतर धुळे शहरातील चाळीसगाव व मालेगाव रोडला जोडणाऱ्या नवीन शंभर फुटी रस्त्यावर जमाव जमू लागला. या रस्त्यावर चाळीसगाव रोड पोलिस ठाणे आहे. या परिसरातील काही भंगारातील वाहने आणि मोटारसायकली जमावाने जाळल्या. चार वाहनांवर दगडफेक केली. टपऱ्यांची नासधूस केली.

पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. "एसआरपी'च्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. असे असताना जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. त्यामुळे हिरे यांच्यासह "एसआरपी'च्या जवानांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत चार राउंड फायर केले. दगडफेकीत पोलिस उपअधीक्षक हिरे, पोलिस निरीक्षक प्रकाश मुंडे यांच्यासह 12 कर्मचारी जखमी झाले. स्थिती नियंत्रणासाठी कठोर पवित्रा घेत पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांसह योग्य ती कारवाई केली. व्हीडीओ शुटींगच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेणे आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे. शंभर फुटी रस्त्यावर दगडांचा खच झाल्याने स्वच्छतेसाठी महापालिकेचे सहकार्य पोलिसांनी घेतले. या संवेदनशील भागात अधिकचा बंदोबस्त असून "एसआरपी'च्या तुकड्याही वाढविल्या जात आहेत. स्थिती नियंत्रणात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. शहरात मुस्लीमबहुल भाग व प्रभागांच्या सीमारेषेवरील परिसरात कडकडीत "बंद' होता. दुपारनंतर मुख्य आग्रा रोडवरील बाजारपेठ खुली झाली. मात्र, विविध घटनांची माहिती मिळाल्याने नागरिकांनी घरी राहणे पसंत केले. शाळा लवकर सोडण्यात आल्या. शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT