dhule market committee
dhule market committee esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Market Committee Election : आज मतदान; साडेसहा हजारांवर मतदार बजावतील हक्क

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यात धुळे, दोंडाईचा-शिंदखेडा, साक्री आणि शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे. (Dhule Market Committee Election Voting today 28 april dhule news)

प्रचाराची सांगता झाल्यानंतर धुळे आणि दोंडाईचा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २८) सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत सरासरी एकूण सहा हजार ६५१ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. तसेच साक्री आणि शिरपूर बाजार समितीसाठी रविवारी (ता. ३०) सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार असून, सरासरी एकूण आठ हजार ४७ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील.

जिल्ह्यात चारही बाजार समित्यांच्या निवडणुकीत रंगत भरली असून, त्यासाठी एकूण १५ हजार ६२३ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. निवडणुकीत शुक्रवारी धुळे बाजार समितीसाठी देवपूरमधील महाराणा प्रताप माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच महाराणा प्राथमिक विद्यामंदिर केंद्रात, तर दोंडाईचा बाजार समितीसाठी वरपाडे (ता. शिंदखेडा) रोडवरील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन, क्रमांक पाच, जिल्हा परिषद ऊर्दू शाळा क्रमांक तीन येथील मतदान केंद्रात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.

असे आहेत मतदार

धुळे बाजार समितीसाठी चार हजार ११५ मतदार असून, त्यात सहकारी संस्था मतदारसंघातील १२३ संस्थांचे एक हजार ५६८ मतदार, ग्रामपंचायत मतदारसंघातील १३१ ग्रामपंचायतींचे एक हजार ३१६ मतदार, व्यापारी व अडते मतदारसंघातील ५२६, हमाल व तोलारी मतदारसंघातील ७०५ मतदार समाविष्ट आहेत. दोंडाईचा बाजार समितीसाठी तीन हजार ४६१ मतदार असून, त्यात सहकारी संस्था मतदारसंघातील ११७ संस्थांचे १४९६ मतदार, ग्रामपंचायत मतदारसंघातील १२२ ग्रामपंचायतींचे एक हजार ९८ मतदार, व्यापारी व अडते मतदारसंघातील ३९९, हमाल व तोलारी मतदारसंघातील ४६८ मतदार समाविष्ट आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

असे एकूण सात हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. तथापि, धुळे, दोंडाईचा बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातील प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्याने त्यासह मतदार वगळता धुळे बाजार समितीसाठी तीन हजार ५८९, तर दोंडाईचा बाजार समितीसाठी तीन हजार ६२ मतदार, असे एकूण सहा हजार ६५१ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील.

मतमोजणी व निकाल

धुळे बाजार समितीसाठी रविवारी (ता. ३०) सकाळी नऊपासून शहरातील पारोळा रोडवरील हमाल व मापाडी भवनात (कृषी उत्पन्न बाजार समिती आवार) मतमोजणीसह निकाल जाहीर होईल. त्याचप्रमाणे दोंडाईचा बाजार समितीसाठी शनिवारी (ता. २९) सकाळी नऊपासून काकाजी मंगल कार्यालय, विरदेल रोड, शिंदखेडा येथे मतमोजणीसह निकाल जाहीर होईल.

साक्री, शिरपूरचे नियोजन

साक्री व शिरपूर बाजार समितीसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया होईल. त्यात साक्री येथे न्यू इंग्लिश स्कूल, माध्यमिक विद्यालय केंद्र, तर शिरपूर येथे पांडू बापू माळी, म्युन्सिपल हायस्कूल केंद्रात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. साक्री बाजार समितीसाठी पाच हजार २३३ मतदार असून, त्यात त्यात सहकारी संस्था मतदारसंघातील ८० संस्थांचे ९६५ मतदार, ग्रामपंचायत मतदारसंघातील १८६ ग्रामपंचायतींचे १७१४ मतदार, व्यापारी व अडते मतदारसंघातील २०९५, हमाल व तोलारी मतदारसंघातील ४५९ मतदार समाविष्ट आहेत.

शिरपूर बाजार समितीसाठी दोन हजार ८१४ मतदार असून, त्यात सहकारी संस्था मतदारसंघातील ८० संस्थांचे एक हजार १२२ मतदार, ग्रामपंचायत मतदारसंघातील ११८ ग्रामपंचायतींचे एक हजार २०९ मतदार, व्यापारी व अडते मतदारसंघातील १५८, हमाल व तोलारी मतदारसंघातील ३२५ मतदार समाविष्ट आहेत. असे एकूण आठ हजार ४७ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील.

तसेच या दोन बाजार समित्यांसाठी रविवारी (ता. ३०) सायंकाळी पाचपासून मतमोजणीसह निकालाची प्रक्रिया सुरू होईल. यात साक्री येथे साक्री बाजार समिती आवारातील इमारतीत, तर शिरपूर येथे शिरपूर बाजार समिती आवारातील आरकेव्हीवाय गुदामात मतमोजणीसह निकालाची प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT