Gold Silver Rate esakal
उत्तर महाराष्ट्र

Gold-Silver Rate : सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार; धुळ्याच्या बाजारपेठेतील स्थिती

Gold-Silver Rate : स्थानिक सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Gold-Silver Rate : स्थानिक सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते, तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात मंगळवारीही (ता. १६) बदल झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच चांदीच्या दरातही बदल झाला. यात दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३ हजार २५० रुपये राहिली. (market Constant fluctuations in gold silver rate )

आठ जुलैच्या ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत ७० हजार ५५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाली होती. चांदी सध्या ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. ११ जुलैला चांदीची किंमत ९४ हजार रुपये प्रति किलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किमतींमध्ये बदल होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

चांदी अजूनही उंचीवर

स्थानिक सराफा बाजारात चांदी अजूनही उंचीवरच आहे. दराने सुमारे ९३ (जीएसटी अतिरिक्त) हजारांचा पल्ला पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या दरात अधिक वाढ होत आहे. चौदा जुलैला चांदीचा भाव ९३ हजार प्रतिकिलो राहिला. २४ कॅरेट सोने आठवडाभरात स्थानिक सराफा बाजारात तीन हजार ५३० रुपयांनी वधारले. जुलैच्या मध्यावर भावात चांदीने सरासरी १०.२३ टक्क्यांची तेजी घेतली.

स्थानिक सराफा बाजारात दरात चढउतार होऊन चांदी आता ९३ हजारांवर स्थिरावली आहे. मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत चांदीच्या दरात झालेली वाढ ही चालू वर्षातील एकूण वाढीच्या ६० टक्के आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत चांदीच्या दरात प्रति किलो १६ हजार रुपयांची म्हणजेच २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. दलालांनी चांदीची खरेदी वाढविल्याने तिचे दर वाढत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. (latest marathi news)

सर्वांत मोठी वाढ

मेमध्ये चांदी दर साडेसहा हजारांनी वाढून ९४ हजार ६०० रुपयांवर पोचला. १८ मे ते आतापर्यंत सराफा बाजारात चांदीच्या दरात चढउतार सुरू आहेत. चांदीचा भाव गेल्या आठवड्यात पाच हजार ८०० रुपयांनी वाढून ९२ हजार ३०० रुपये प्रति किलो झाला. दोन वर्षांतील चांदीची ही सर्वांत मोठी वाढ मानली गेली.

यापूर्वी २०२२ मध्ये एकाच दिवसात तिच्या किमती ८.५ टक्के वाढल्या होत्या. यापूर्वी १७ मेस चांदीने ८६ हजार ५०० रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. या महिन्यात चांदीच्या किमतीत १६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. २८ मेस तर थेट ९४ हजार ६०० रुपयांपर्यंत पोचली होती. आगामी सणासुदीच्या दिवसांत सोने दर वाढण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तविली.

कॅरेटमध्ये काय फरक?

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते, की २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे, की २४ कॅरेटचे? २४ कॅरेट सोने ९९.९ टक्के शुद्ध असते आणि २२ कॅरेट अंदाजे ९१ टक्के शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या नऊ टक्के अन्य धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विक्री करतात.

स्थानिक बाजारातील सोने-चांदी दर

(जीएसटी अतिरिक्त/चांदी प्रतिकिलो/सोने प्रतितोळे रुपये)

दिनांक.........चांदी.........सोने (२४ कॅरेट)....सोने (२२ कॅरेट)

* १५ जुलै....९२,५००....७३,२५०............६७,१५०

* १४ जुलै....९२,५००....७३,२००.............६७,८००

* १३ जुलै....९३,०००....७३,२००..............६७,८००

* १२ जुलै....९२,०००....७२,९००..............६६,९१०

* ११ जुलै....९४,०००....७३,१००..............६७,१००

* १० जुलै....९२,५००....७३,१००...............६७,७००

* ९ जुलै....९२,४००......७३,१००.................६७,१००

* ८ जुलै....९२,५००......७०,५५०.................६७,५१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT