Municipal Corporation team on Monday sealed Mangal's office on Gondur Road for non-payment of dues.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : थकबाकी न भरल्याने मंगल कार्यालय ‘सील’; महापालिका पथकाची कारवाई

Dhule Municipality : मालमत्ता करापोटी तब्बल आठ लाख रुपये थकबाकी असताना ती न भरल्याने महापालिकेच्या कारवाई पथकाने सोमवारी (ता. २६) शहरातील देवपूर भागातील शिवसागर मंगल कार्यालयाला सील ठोकले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : मालमत्ता करापोटी तब्बल आठ लाख रुपये थकबाकी असताना ती न भरल्याने महापालिकेच्या कारवाई पथकाने सोमवारी (ता. २६) शहरातील देवपूर भागातील शिवसागर मंगल कार्यालयाला सील ठोकले.

धुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी पथके नियुक्त केली आहेत. (Dhule Marriage hall sealed)

शिवाय आता प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्या नियंत्रणात उपायुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची पथके ॲक्टिव्ह झाली आहेत.

सोमवारी (ता. २६) धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील जिल्हा क्रीडासंकुलासमोर असलेल्या गोंदूर रोडवरील शिवसागर मंगल कार्यालयाचे मालक मराठे यांच्याकडे आठ लाख दहा हजार ८५ रुपये थकबाकी असल्याने वारंवार नोटीस देऊनही त्यांनी थकबाकी न भरल्याने पथकाने मंगल कार्यालयाला सील ठोकले. (latest marathi news)

वसुली अधीक्षक शिरीष जाधव, पंकज शर्मा, किशोर शिंदे, मनोज चिलंदे, मुकुंद अग्रवाल, रवींद्र पाटील, ईश्‍वर धनगर, जयंत पाटील, किशोर सोनवणे, गजानन वाघ, सचिन पवार, वाहिद अली यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, इतरही बड्या थकबाकीदारांना महापालिकेकडून वारंवार थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तशा नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतरही प्रतिसाद न देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

थकबाकीदारांना दिलासा म्हणून महापालिकेने शंभर टक्के शास्तीमाफी योजनाही लागू केली आहे. लोकअदालतीच्या माध्यमातूनही थकबाकी प्रकरणाचा निपटारा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT