While inaugurating the program by lighting the lamp and distributing various items and certificates to the beneficiaries through the Integrated Tribal Development Project Office, Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit, MP Dr. Heena gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: शासनाच्या विविध योजनांतून आदिवासींच्या विकासाला मदत : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Dhule News : योजनांच्या माध्यमातून आदिवासी समूहाचा विकास होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : राज्यातील आदिवासी जनतेच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध वैयक्तिक व सामुदायिक योजना असून, या योजनांच्या माध्यमातून आदिवासी समूहाचा विकास होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. (Dhule Minister Dr Vijayakumar gavit tribal community marathi news)

सामोडे (पिंपळनेर, ता. साक्री) येथे गुरुवारी (ता. ७) धुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून वैयक्तिक व सामुदायिक लाभाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना साहित्यवाटप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम झाला. मंत्री डॉ. गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद सदस्य खंडू कुवर, सुमित्रा गांगर्डे, छगन राऊत, गोकुळ परदेशी, विजय ठाकरे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोज पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले, की आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प अर्थात न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत तसेच राज्य शासनामार्फत शेती, अवजारे, कोंबड्या, शेळ्या, दुभत्या गायी, म्हशी, राहण्यासाठी शबरी घरकुल योजना, युवकांसाठी क्रिकेट संच साहित्य, ज्येष्ठ मंडळींना भजनी मंडळ साहित्य, महिला सबलीकरणासाठी बचतगटांना व्यवसायासाठी कर्ज, उत्पन्नवाढीच्या, प्रशिक्षणाच्या व इतर कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आदिवासी विकास विभागामार्फत सुरू आहे. या योजनांमधून आदिवासी समाजाला आत्मनिर्भर होण्यासाठी मोठी मदत होत आहे. (Latest Marathi News)

घरकुलसाठी अर्ज करा

शबरी आवास योजनेपासून जे पात्र लाभार्थी अद्यापही वंचित आहेत. त्यांनी त्वरित अर्ज भरून द्यावेत, जेणेकरून जूनपर्यंत त्यांनाही घरकुल मंजूर होऊन लाभ मिळेल, असेही डॉ. गावित म्हणाले. पश्चिम पट्ट्यातील बंधारे बांधण्यासाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव तातडीने सादर करावा. त्याचबरोबर आता पालिका हद्दीतही शबरी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार डॉ. हीना गावित यांनीही मनोगत व्यक्त केले.

लाभाचे वाटप

मान्यवरांच्या हस्ते शबरी घरकुल योजनेंतर्गत एक हजार १९४ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशाचे वाटप करण्यात आले. ३६९ महिला बचतगटांना प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे ३६ लाख ९० हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यावर थेट जमा करण्यात आले.

तसेच ५० क्रिकेट संघांना क्रिकेट साहित्य, ५० भजनी मंडळांना प्रातिनिधिक स्वरूपात भजनी साहित्यवाटप झाले. प्रकल्प अधिकारी पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश कोकणी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT