Malangaon project full capacity due to heavy rainfall in the area and at the source of river Kan. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Monsoon : मालनगाव धरण ‘ओव्हरफ्लो’; आमळी परिसरात मुसळधार

Dhule Monsoon : जोरदार पावसामुळे आणि गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे कान नदीवरील मालनगाव मध्यम प्रकल्प शुक्रवारी (ता. २६) ओव्हरफ्लो झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Monsoon : आमळी परिसरात गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे कान नदीवरील मालनगाव मध्यम प्रकल्प शुक्रवारी (ता. २६) ओव्हरफ्लो झाला. या प्रकल्पाची क्षमता ४००.१२ दशलक्ष घनफूट आहे. गेल्या काही दिवसांपासून आमळी व कान नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस झाल्याने या परिसराला अक्षरश: झोडपून काढले. (Malegaon Dam Overflow Heavy rain in Ambli area )

कान नदीला पूर आला असून, शेतशिवारातील नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत यंदा तीन दिवस आधी धरण भरले. दरम्यान, आमळी येथे शुक्रवारी (ता. २६) सकाळी साडेआठपर्यंत गेल्या २४ तासांत ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत ५५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाने एक दिवसात सर्वांत मोठ्या पावसाची नोंद शुक्रवारी सकाळी झाली.

जून व जुलैच्या मध्यापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. गुरुवारी दुपारपासूनच पावसाचा जोर वाढला व रात्री उशिरा पावसाने रौद्ररूप धारण करून अतिमुसळधार कोसळला. त्यामुळे परिसरातील घरांच्या छतांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली. त्यामुळे आमळीकडे व पश्चिम भागात मुसळधार असलेला पाऊस दहिवेलच्या पूर्वेकडे काहीसा कमी झालेला आहे. शुक्रवारीही दिवसभर पावसाचा जोर कायम होता.

परिसरात जुलैच्या दुसऱ्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असून, संततधार, तर कधी जोरदार सरी कोसळत आहेत. परिसरात प्रारंभीचे मृग नक्षत्र कोरडे गेले. मात्र आर्द्रा नक्षत्राच्या सुरवातीपासूनच पाऊस झाल्याने त्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर पुनर्वसू व पुष्य नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या आठवडाभरापासून आमळीत पुरेसे सूर्यदर्शन झाले नाही. परिसरात पाऊस सक्रिय असून, सध्या दमदार होत आहे. (latest marathi news)

मात्र सततच्या पावसामुळे कोळपणी, निंदणी, आंतरमशागतीची कामे फवारणी व पिकांना खताची मात्रा ही देता येत नसल्याने शेतीची कामे ठप्प आहेत. मात्र सध्या भात, नागली पुनर्लागवडीच्या कामांना मोठा वेग आला आहे. मालनगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने व कान नदीच्या उगमस्थानावर पावसाचा जोर कायम असल्याने कान नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभाग व उपविभागीय पाटबंधारे उपविभाग, साक्री व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कान नदीला दोन वर्षांनी पूर

साक्री : गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या सर्वच भागांत समाधानकारक पाऊस होत असताना गेल्या ४८ तासांत सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. मालनगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने कान नदीतील पाण्याचा विसर्ग वाढून दोन वर्षांनंतर कान नदीला पूर आला आहे. माळमाथा परिसरातील बुराई नदीलादेखील मोठा पूर आला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने यंदा पावसाचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत तालुक्याच्या सर्वच भागांत पावसाने हजेरी लावल्याने सरासरी ८५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात उमरपाटा आणि दहिवेल मंडळात प्रत्येकी सरासरी ११६ मिलिमीटर पाऊस झाला असून, कुडाशी परिसरात ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT